no images were found
रेसिडेन्सी क्लब पुरस्कृतकोल्हापूर जिल्हा निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा दिमाखात प्रारंभ
कोल्हापूर ( प्रतिनीधी ):- चेस असोसिएशन कोल्हापूरने जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित केलेल्या कोल्हापूर जिल्हा निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा आज रेसिडेन्सी क्लब येथे सुरू झाल्या..स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे.इचलकरंजी जयसिंगपूर, वारणा, वडगाव, कागल, गगनबावडा,गडहिंग्लज,आजरा व स्थानिक कोल्हापुरातील नामवंत 92 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे,युवा नेते चेतन नरके,रेसिडेन्सी क्लबचे सचिव अमर गांधी,खजिनदार नरेश चंदवानी,व रवी संघवी यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर चेस असोसिएशन कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले,धीरज वैद्य,मनीष मारुलकर,अनिश गांधी,सोहम खासबारदार,उत्कर्ष लोमटे व आरती मोदी उपस्थित होते.
आज झालेल्या चौथ्या फेरीनंतरअग्रमानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर,द्वितीय मानांकित रवींद्र निकम इचलकरंजी,तृतीय मानांकित,कोल्हापूर चा सोहम खासबारदार,व चौथा मानांकित कोल्हापूरचा प्रणव पाटील हे चौघेजण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.पाचवा मानांकित इचलकरंजीच्या विवान सोनीसह कोल्हापूरचे प्रणव मोरे व रवींद्र कुलकर्णी साडेतीन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.ज्येष्ठ बुद्धिबळपटू कोल्हापूर चे माधव देवस्थळी,कागल चा स्वरूप जोशी,कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर ,आजऱ्याचे शंकर सावंत,कोल्हापूरचे अरिना मोदी, आरव पाटील, व रवि आंबेकर यांच्यासह एकूण 22 जण तीन गुणासह संयुक्तपणे तृतीय स्थानावर आहेत.