no images were found
शिवाजी विद्यापीठात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात दि. 24 आणि 25 नोव्हेंबर 2022 रोजी युसीजी स्किम फाॅर पर्सन व्हिथ डिसॅबिलीटीज्, समाशास्त्र अधिविभाग, सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्र आणि नॅक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने National Education Policy: 2020 Road Map for Egalitarian Society या विशयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद रामानुजन हाॅल याठिकाणी आयोजित करण्यात आली हेाती. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक परिषदेच्या समन्वयिका डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सुजाता भान, मुंबई या उपस्थित होत्या यांनी National Education Policy: 2020 Road Map for Egalitarian Society या विषयावर त्यांनी उद्घाटन समारंभाचे भाषण दिले त्या बोलत असताना नवीन शैक्षणिक धोरण 2020 हा सर्व घटकांना कोणत्या पध्दतीने सामावून घेतला आहे यावर त्यांनी प्रकाश झोत टाकला याचबरोबर अध्ययन अक्षमता असलेल्या दिव्यांगत्वाबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली व अध्ययन अक्षमता असलेला घटक याबाबत त्यांनी सविस्तर भाष्य केले. यावेळी पाहुण्याची ओळख डॉ. प्रतिमा पवार यांनी केली व या सत्राचे आभार डॉ. एम. एस. वासवाणी यांनी मानले. यावेळी मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिवाजी विद्यापीठ हे नवीन शैक्षणिक धोरण कोणत्या पध्दतीने राबवत आहे व शिवाजी विद्यापीठ दिव्यांगाबाबत करत असलेल्या कामाबद्दल त्यांनी माहिती दिली यावेळी समाजशास्त्र अधिविभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून डॉ. वैशाली कोल्हे, मुंबई या आॅनलाईन उपस्थित होत्या त्यांनी NEP 2020 & Accessibility Guidelines Disability Inclusion in Higher Education या विषयावरती आपले मत मांडले. दुसÚया सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा. टाटा क्रिष्णा, दिल्ली हे आॅनलाईन उपस्थित होते त्यांनी Persons with Disabilities and new Education Policy: Implementation of Strategies या विषयावरती आपले मत मांडले. राष्ट्रीय परिषदेच्या दुसÚया दिवशी पहिल्या सत्रामध्ये प्रा. बी. एन. जगताप हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असून त्यांनी National Education Policy 2020 या विषयावरती आपले मत मांडले. दुसÚया सत्रामध्ये प्रमुख वक्ते म्हणून प्रा. संध्या लिमये, मुंबई हया आॅनलाईन उपस्थित होत्या त्यांनी Persons with Disabilities and New Education Policy या विषयावरती आपले मत मांडले.