Home शैक्षणिक ‘स्कोपस व  निम्बस विषयी’ कार्यक्रमाचे  शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजन

‘स्कोपस व  निम्बस विषयी’ कार्यक्रमाचे  शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजन

9 second read
0
0
19

no images were found

‘स्कोपस व  निम्बस विषयी’ कार्यक्रमाचे  शिवाजी विद्यापीठामध्ये आयोजन

  कोल्हापूर  ( प्रतिनिधी ):- बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र व ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने   दि. २२ जुलै २०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता राजर्षी शाहू सिनेट हॉल, मुख्य इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे ‘ अवेअरनेस प्रोग्राम ऑन स्कोपस अॅण्ड निम्बस’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक व पी. एच. डी नोंदणी केलेले सर्व संशोधक याकरिता सदर  कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर कार्यशाळेमध्ये श्री. गिरीश कुलकर्णी हे ‘निम्बस’ या वेब स्केल डिस्कवरी सेवेविषयी व श्रीमती ऐश्वर्या नायल, एल्सवियर, नवी दिल्ली या ‘स्कोपस’या डेटाबेस विषयी तज्ञ व्याख्यान देणार असून मा. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के सर अध्यक्षस्थान भूषविणार मा. प्र- कुलगुरू  डॉ. पी. एस. पाटील सर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाचा शिवाजी विद्यापीठातील सर्व संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक डॉ. धनंजय सुतार प्र. संचालक, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञान स्त्रोत केंद्र व डॉ. सचिनकुमार पाटील, विभागप्रमुख, ग्रंथालय आणि  माहितीशास्त्र अधिविभाग यांनी केले आहे.     

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…