Home स्पोर्ट्स ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगणार!

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगणार!

0 second read
0
0
61

no images were found

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगणार!

पुणे : ”महाराष्ट्र केसरी” कुस्ती स्पर्धेचे आयोजन संस्कृती प्रतिष्ठानकडून १० ते १४ जानेवारी या कालावधीत पुण्यात होणार आहे. कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी, किनारा हॉटेल जवळ, कोथरूड, पुणे येथे या कुस्ती स्पर्धेचा आनंद कुस्तीप्रेमींना घेता येईल. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस व कुस्ती स्पर्धेचे मुख्य संयोजक व संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यावेळी रामदास तडस म्हणाले, “अत्यंत चुरशीची समजल्या जाणाऱ्या ”महाराष्ट्र केसरी”चे हे ६५ वे वर्ष आहे. या स्पर्धेत खेळण्याचे प्रत्येक मल्लाचे स्वप्न असते. वर्षभर त्यासाठी मल्ल तयारी करत स्पर्धेची वाट पाहत असतात. यंदा ही स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असून, सलग पाच दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. राज्यभरातील मल्ल एकमेकांशी भिडणार आहेत. ४७ तालीम संघातील ९०० मल्ल सहभागी होतील. विविध दहा वजनी गटात, माती आणि गादी विभागात या कुस्त्या होतील.

याप्रसंगी मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘कै. मामासाहेब मोहोळ यांच्या संकल्पनेतून आणि दूरदर्शी विचारातून ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेची जबाबदारी आम्हा मोहोळ कुटुंबीयांकडे आली, ही आनंदाची बाब आहे. ”महाराष्ट्र केसरी”ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. समारोप व बक्षीस वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंग यांची उपस्थिती दि.१४ला राहील.’

यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अस्थायी समितीचे चेअरमन संजय कुमारसिंह, काका पवार, संदीप भोंडवे, योगेश दोडके, हनुमंत गावडे, विलास कथुरे आदी उपस्थित होते. ६५ व्या ”महाराष्ट्र केसरी”साठी कोथरूडमधील कै. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीमध्ये जय्यत तयारी झालेली आहे. येथील ३० एकर जागेत १० ते १४ जानेवारी दरम्यान या प्रेक्षणीय कुस्ती स्पर्धा होतील. नुकतेच मंगळवारी या मैदानाचे उद्घाटन महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेची जय्यत तयारी झाली असून ७० हजार लोकांसाठी आसनव्यवस्था सज्ज करण्यात आली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…