
no images were found
अटलने मुलींना मिळवून दिला शिक्षणाचा अधिकार!
अटल (व्योम ठक्कर)मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पंचायतसमोर लक्षवेधक युक्तिवाद सादर करत असताना तोमर मुलींच्या पालकांना त्यांना तेथून घरी घेऊन जाण्यास सांगतो. पालक मुलींकडे जात असताना विविध मोहल्लामधील अधिक मुली अटलला मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याच्या त्याच्या प्रयत्नामध्ये पाठिंबा देण्यासाठी सामील होतात. या एपिसोडबाबत सांगताना कृष्णा देवी ऊर्फ नेहा जोशी म्हणाल्या, “पंचायतमध्ये अटल सर्वांना विचारतो की ग्वाल्हेर प्रगतीशील शहर म्हणून ओळखले जावे की मुलींना शिक्षण न देणारे शहर म्हणून ओळखले जावे. तो राजाच्या प्रतिनिधीला कळवतो की, तोमर मुलींच्या शिक्षणाला विरोध करण्यासोबत धूर्तपणे दोष मुलींच्या वडिलांना देत आहे. अटल पंचायतसमोर आपले मत मांडण्याचे ठरवतो तेव्हा राजाचा प्रतिनिधी मुलींना शिक्षणाचा अधिकार देण्याचा निर्णय जाहीर करतो.” पण मुलींचे वडिल या निर्णयाला विरोध करतात, पण प्रतिनिधी त्यांना सांगतो की राजाचा निर्णय अंतिम आहे. राजाचा प्रतिनिधी अटलचे वडिल कृष्णा बिहारी (आशुतोष कुलकर्णी)यांना देखील सांगतो की एकेदिवशी, अटल ग्वाल्हेर आणि भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करेल. कृष्णा देवी पुढे म्हणाल्या, “सरपंच या निर्णयाबाबत त्यांची निराशा व्यक्त करतात, कारण यामुळे वडिल व त्यांच्या मुलींमध्ये दुरावा निर्माण होईल. मुली अटलचे त्याच्या प्रयत्नासाठी आभार मानतात. पण, सुशिला बुआ (दीपा सावरगावकर) अटलविरोधात सूड घेण्यासाठी मुलींच्या वडिलांना अटलच्या कुटुंबियांना नुकसान करण्यास सांगते. शेवटी, मुलींचे वडिल अवधला मारहाण करतात आणि वाजपेयी कुटुंबाला चेतावणी देतात की अटलच्या कृत्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे अधिक नुकसान होईल. मारहाणीमुळे दुखापत झालेला व संतापलेला अवध अटलला घरी घेऊन जातो आणि सर्वांना सांगतो की अटल त्याच्या सूचना व कामाचे पालन करेल. दुविधेमध्ये असलेला अटल अवधचे मत मान्य करतो.”