no images were found
पारस कलनावट आणि अद्रिजा रॉय यांनी चित्रीत केला स्वप्नवत ‘बारिशवाला रोमांस’
रिमझिम बरसणाऱ्या पावसाचे प्रणयी लोकांच्या हृदयात नेहमीच एक वेगळे खास स्थान असते. जवळ जवळ प्रत्येक बॉलीवूड चित्रपटामध्ये नायक नायिकेची जोडी ‘बारिशवाला रोमांस’ करताना दिसते. त्यामुळे अर्थातच सगळ्याच नवकलाकारांच्या मनातही एक दिवस पावसातील हे प्रणयी दृश्य साकारण्याचे स्वप्न असते. हल्लीच झी टीव्हीवरील ‘कुंडली भाग्य’मधील पारस कलनावट आणि अद्रिजा रॉय यांनी पावसातील प्रणय साकारण्याचे आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
पारस कलनावट म्हणाला, “पावसात प्रणयी दृश्य चित्रीकत करण्याचे स्वप्न मी कायमच उराशी बाळगले होते आणि त्यामुळे ह्या दृश्याचे चित्रीकरण करणे म्हणजे ते स्वप्नच पूर्ण झाल्यासारखे होते. मला खूपच छान वाटले जेव्हा हे स्वप्न मुंबईच्या पावसात पूर्ण झाले. बॉलीवूड चित्रपट पाहत मी लहानाचा मोठा झालो आहे आणि अर्थातच एक अभिनेता म्हणून मला नेहमीच असे काहीतरी दृश्य चित्रीत करायचे होते.”
अद्रिजा रॉय म्हणाली, “मला मान्सून अतिशय आवडतो आणि जेव्हा मला कळले की पारस आणि मी पावसात दृश्य चित्रीत करणार आहोत तेव्हा मी खूपच उत्साहात होते. तो क्षण अगदी गोड होता जिथे माझी व्यक्तिरेखा पाल्की तुरूंगातून बाहेर येते आणि राजवीर पारस ला मिठी मारते. त्या वातावरणामध्ये चित्रीकरण करणे खूपच आव्हानात्मक होते पण टीम आमच्या शॉटमुळे समाधानी ते पाहून आम्हांला आनंद वाटला आणि अर्थातच आमच्या कठोर परिश्रमाचे आम्हांला फळ मिळाले.”
पारस आणि अद्रिजा यांनी मुंबईच्या पावसात आपल्या स्वप्नातील दृश्य जगले, त्यातच प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की काय होईल जेव्हा पाल्की तुरूंगातून बाहेर आल्यानंतर आपल्या पालकांना भेटेल. काय ते तिला स्वीकारतील, ते तिच्यावर विश्वास ठेवतील?