no images were found
‘पीएफआय’चा मौला मुल्ला त्यास 12 दिवसांची पोलिस कोठडी
नाशिक : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि दहशतवादविरोधी (एटीएस) पथकाने बुधवारी मध्यरात्री कोल्हापूरच्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ला येथील साहिल अपार्टमेंटमध्ये छापा टाकून मौला नबीसाब मुल्ला (रबी सहाब मुल्ला) (वय 38) याला अटक केली. नाशिक येथील न्यायालयाने त्यास 12 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
मुल्ला व्यवसायाने ग्राफीक्स डिझायनर असून, त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेसह ‘एटीएस’च्या पथकाने बुधवारी रात्री एकाचवेळी देशभर छापेमारी केली. संशयित मौला मुल्ला याचा शहरातील विक्रमनगर, टेंबलाईवाडीसह उचगाव येथील मणेर मळा परिसरात सतत वावर असायचा. विक्रमनगर परिसरात तो नेहमी गराड्यात असायचा. संयुक्त पथकांसह राजारामपुरी पोलिसांनीही मुल्लाच्या स्थानिक साथीदारांचा शोध सुरू केला आहे. मुल्लाच्या कारनाम्याची माहिती असल्यास संबंधित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी केले आहे.
देशविघातक कृत्यात सहभाग असल्याच्या संशयातून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरुद्ध देशभरात छापेमारी सुरू असतानाच विशेष पथकाने मूळचा कर्नाटकचा; पण सध्या जवाहरनगर-सुभाषनगर परिसरातील सिरत मोहल्ल्यातून संशयिताला ताब्यात घेतल्याची बातमी शहरात वार्याभसारखी पसरली.
संशयित मुल्लाने डिसेंबर 2021 मध्ये विक्रमनगरसह परिसरात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संशयितावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याची कारागृहातही रवानगी करण्यात आली होती. राजारामपुरी पोलिसांचा डिसेंबरपासून त्याच्या हालचालींवर ‘वॉच’ होता.
बुधवारी मध्यरात्रीला ‘एनआयए’ व ‘एटीएस’च्या संयुक्त पथकातील सूत्रांनी राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. कारवाईसाठी पथक कोल्हापुरात दाखल होत आहे. गरज भासल्यास मनुष्यबळ सतर्क ठेवण्याची सूचना देण्यात आली.
पथकातील अधिकार्यांठनी संशयिताच्या घराची तपासणी केली. खोलीतून काही आक्षेपार्ह कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतल्याचे समजते. अडीच तासांच्या चौकशीनंतर पथकाने संशयिताचा ताबा घेतला. गुरुवारी पहाटे पाचला विशेष पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे सूत्रांकडून समजते. छापा कारवाईबाबत अधिकारी, कर्मचार्यांानी गोपनीयता पाळली होती.
संशयिताचे वडील नबीसाब मुल्ला हे मूळचे कर्नाटकातील. उदरनिर्वाहासाठी मुल्ला कुटुंब 45 वर्षांपूर्वी उचगाव येथील मणेर मळ्यात वास्तव्याला आले.