
no images were found
नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये खात्यात जमा होणार
नमो शेतकरी योजनेचे ४००० हजार रुपये लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.
पीएम किसान सन्मान योजना व नमो शेतकरी महसन्मान योजना या दोन्ही योजनाचा लाभ आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
आता लवकरच शेतकऱ्यांना एका नवीन योजनाचा लाभ घेता येणार आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना ही योजना नवीन सुरू करण्यात आली आहे.
या योजनेचा पहिलाच हप्ता शेतकऱ्यांना याच महिन्यात मिळणार आहे त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ही नवीन योजना सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणेच आहे
त्यामुळे शेतकऱ्यांना आता दोन हजार न मिळता चार हजार मिळणार आहे. वर्षभरात लागणाऱ्या निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे पात्र शेतकऱ्याची यादी अंतिम करण्यात येत असून त्यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जात आहे. ही यादी पाठवण्यासाठी राज्याच्या राज्याच्या कृषि विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.
तिला आता अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सन्मान निधीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली असून केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचे तीन हप्ते असे सहा हजार जमा होतात.सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26 हजार रुपये जमा झालेत. त्याच्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजणेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहे.
त्यामूळे राज्य आणि केंद्र मिळून 12 हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कोरोंना नंतर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिति बेटाचीच असताना निधी उभारण्याचे आवाहन आहे.त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणीत निधीची तरतूद करण्यात येईल.त्याआधी आपत्कालीन निधीसाठीच्या रक्कमेतून शेतकऱ्यांना सन्मान निधीचा हप्ता दिला जाईल असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले आहे.