no images were found
डीकेटीईचे प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश
इचलकरंजी (प्रतिनिधी): येथील डीकेटीईचे टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टियूट च्या विद्यार्थ्याानी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये लाक्षणीक यश मिळवले आहे. उच्चशिक्षणामध्ये भारत सरकारच्या नविन अभ्यासक्रमाअंतर्गत टिचींगबरोबरच विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक आणि उदयोजकता विकास वाढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार डीकेटीईच्या आयआयसी, स्टार्टअप आणि युक्ती सेल अंतर्गत राबविले जाणारे विविध उपक्रम आणि त्यातूनच विद्यार्थ्यांमध्ये रुजलेल्या संशोधनात्मक वृत्तीमुळे डीकेटीईने प्रकल्प सादरीकरणांमध्ये विविध स्तरावर आपला डंका वाजविला आहे.
शेतीपासून नागरी सुरक्षेपर्यंत आणि कार पार्किंगपासून अंतराळ संशोधन क्षेत्रापयर्ंत इलेक्ट्रॉनिक्सच्या व सॉफटवेअरच्या वापराने डीकेटीईच्या प्रकल्पांनी गेल्या वर्षाभरात एकूण ४२ बक्षिसे मिळवीली आहेत. यामध्ये १९ बक्षिसे ही प्रथम क्रमांकाची असून यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाचे सादरीकरण आयआयटी मुंबई, पीआयसीटी पुणे, के.के.वाघ इंजिनिअरींग कॉलेज नाशिक, भारतटेक्स दिल्ली, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, केआयटी कोल्हापूर, आरआयटी इस्लामपूर इ. नामांकित कॉलेजमध्ये केले होते. दुस-या व तिस-या क्रमांकाची आणि उत्तेजनार्थ अशी एकूण इतर २० बक्षिसे मिळवली आहेत. याखेरीज एआयसीटीई, नवी दिल्ली व आयआयसी इन्व्होवेशन सेल, भारत सरकार यांच्या अंतर्गत युक्ती इन्व्होवेशन ग्रँण्ड चॅलेजमध्ये संपूर्ण भारतभरातून आलेल्या १३९ नवीन संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादरीकरण केले. या स्पर्धेत डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागामधील बे्रस्ट कॅन्सरग्रस्त पेशंटसाठीच्या प्रकल्पास ५ लाखाचा सहायत्ता निधी सरकारने दिला आहे. त्याचबरोबर आयआयटी, मुंबई चाणक्य स्कॉलरशीप अंतर्गत शेतातील इरिगेशन सिस्टीम स्मार्ट बनविणा-या इटीसीच्या प्रोजेक्टसाठी ६ लाखाचा निधी थेट विद्यार्थ्यांना मिळाला आहे. याव्यतीरिक्त टाटा टेक्नॉलॉजीस आणि गोकुळ शिरगांव एमआयडीसी गोशिमा असोसिएशन कडून मेकॅनिकल आणि टेक्स्टाईलच्या एकूण दहा प्रकल्पाना दीड लाखाचा प्रकल्प संशोधन निधी मिळाला आहे. रेडी इंजिनिअर मॅजिक स्टार्टअप आणि महाराष्ट्र इन्व्होवेशन सोसायटी महाराष्ट्र सरकार यांच्याकडून दोन विविध प्रकल्पांसाठी अडीच लाखाचा निधी मिळाला आहे. या खेरीज टाटा टेक्नॉलॉजी आणि गोशिमा यांचेकडून दोन प्रकल्पांची उत्कृष्ट प्रकल्प म्हणून निवड केली आहे. डीकेटीईच्या आयडीया लॅबमध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. विद्यार्थीदशेत शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी जागतिक बाजारपेठेत होत असलेले नवीन बदल व नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालून समाजउपयोगी उपकरणे निर्माण करण्यासाठी आयडीया लॅबचा उपयोग होत आहे. डीकेटीईच्या या शिक्षणपध्दतीमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना मिळाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल असा विश्वास संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे यांनी व्यक्त केला.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे , उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी प्रोजेक्ट विजेते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे प्र. संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे.पाटील सर्व विभागप्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.