no images were found
दिव्यांग आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकर स्मृती भव्य जलद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने राम गणेश गडकरी हॉलमध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू शैलेश नेर्लीकर स्मृती अकरा वर्षाखालील,सतरा वर्षाखालील व खुल्या गटातील बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या. या तिन्ही गटांमध्ये अग्रमानांकितांनी बाजी मारत अजिंक्यपद मिळविले.स्विस लीग पद्धतीने एकूण सात फेऱ्यात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सातव्या फेरीनंतर खुल्या गटामध्ये अत्यंत चुरशीने झालेल्या स्पर्धेत अग्रमानांकित कोल्हापूरच्या अनिश गांधीने सात पैकी सहा गुण करीत सरस टायब्रेक गुणानुसार अजिंक्यपद पटकावले तर सहावा मानांकित सातारचा अनिकेत बापट ला सहा गुण मिळवूनही टायब्रेक गुणानुसार उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर,द्वितीय मानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले व 14 मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार हे तिघेजण साडेपाच गुणासह टायब्रेक गुणानुसार अनुक्रमे तिसरे,चौथे व पाचवे स्थानी आले.
विजेत्या अनिश गांधीला सात हजार रुपये व चषक उपविजेता अनिकेत बापटला पाच हजार रुपये व चषक, तृतीय आदित्य सावळकर ला तीन हजार रुपये चषक देऊन गौरविण्यात आले.श्रीराज भोसले ला दोन हजार रुपयाचे तर सोहम खासबारदारला एक हजार रुपयाचे बक्षीस मिळाले.
17 वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरने साडेसहा गुणासह अजिंक्यपद मिळविले त्याला रोख पाच हजार रुपये व चषक देऊन गौरविले.द्वितीय मानांकित सातारचा अपूर्व देशमुख व तृतीय मानांकित जयसिंगपूरची दिशा पाटील या दोघांचे सहा गुण झाले.सरस टायब्रेक गुणानुसार अपूर्व ला उपविजेतेपद तर दिशाला तृतीय स्थान मिळाले.अपूर्व ला रोख तीन हजार रुपये व चषक तर दिशाला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.आठवा मानांकित कोल्हापूरचा शंतनू पाटील व नववा मानांकित चिपळूणचा ओंकार सावर्डेकर साडेपाच गुणासह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आले.शंतनुला एक हजार रुपयाचे तर ओंकारला सातशे रुपयाचे बक्षीस मिळाले.
अकरा वर्षाखालील मुलांच्या गटात अग्रमानांकित इचलकरंजीच्या विवान सोनी साडेसहा गुणासह अजिंक्य ठरला.त्याला रोख पाच रुपये व चषक देऊन गौरविले.सहावा मानांकित सांगलीच्या आशिष मोठेने सहा गुणासह उपविजेतेपद मिळविले त्याला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरवले तर चौथा मनांकित सांगलीचा वरद पाटील ने साडेपाच गुणासह तृतीय स्थान पटकावले त्याला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले.चौथा मानांकित कोल्हापूरचा आरव पाटील साडेपाच गुणासह चौथ्या स्थानी आला त्याला रोख एक हजार रुपयाचे बक्षीस मिळाले तर सातवा मानांकित जयसिंगपूरच्या हित बलदवाने पाच गुणासह पाचवे स्थान मिळविले त्याला रोख सातशे रुपयाचे बक्षीस मिळाले.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ शैलेशचे वडील मधुकर नेर्लीकर, आई सरला नेर्लीकर व बहीण तहसीलदार सुनीता नेर्लीकर – क्षीरसागर, धनंजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मनीष मारुलकर,धीरज वैद्य,धनंजय इनामदार, उत्कर्ष लोमटे, माधव देवस्थळी, निपाणीचे भारत पाटोळे, रत्नागिरीचे सुहास कामतेकर उपस्थित होते आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आरती मोदी(मुख्य पंच) रोहित पोळ,किरण शिंदे व अनुराधा गुळवणी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
इतर बक्षीस विजेते पुढील प्रमाणे
खुला गट
6) विक्रमादित्य चव्हाण सांगली 7) प्रणव पाटील कोल्हापूर 8) आयुष महाजन कोल्हापूर 9) संतोष सर्रीकर इस्लामपूर 10) मुद्दसर पटेल मिरज 11) ओंकार कडव सातारा 12) आदित्य चव्हाण सांगली 13) वरद आठल्ये कोल्हापूर 14) रवींद्र निकम इचलकरंजी 15) अब्दुल लतीफ आंध्र प्रदेश 16) अभय भोसले जांभळी 17) प्रथमेश लोटके इचलकरंजी 18) धनंजय इनामदार कोल्हापूर 19) प्रशांत पिसे लातूर 20) प्रवीण सावर्डेकर चिपळूण 21) शर्विल पाटील कोल्हापूर
सतरा वर्षाखालील मुले
6)स्वरूप साळवे गडहिंग्लज 7)ईशान कुलकर्णी सांगली 8)ईश्वरी जगदाळे सांगली 9)सर्वेश पोतदार कोल्हापूर 10)आदित्य कोळी सांगली
अकरा वर्षाखालील मुले
6)कश्यप खाकरीया सांगली 7)अवनीत नांदणीकर सांगली 8)अनवय भिवरे कोल्हापूर 9)आदित्य ठाकूर अतिग्रे 10)प्रेम निचल सेनापती कापशी
उत्तेजनार्थ बक्षीस आहे
ज्येष्ठ बुद्धिबळपटू
1)राजू सोनेचा सांगली 2)बी.एस.नाईक कोल्हापूर 3)भारत पाटोळे निपाणी 4)माधव देवस्थळी कोल्हापूर 5)रवींद्र कुलकर्णी कोल्हापूर
उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू
1)तृप्ती प्रभू कोल्हापूर 2)दिव्या पाटील जयसिंगपूर 3)शर्वरी कबनूरकर कोल्हापूर 4)श्रावणी खाडे पाटील कोल्हापूर 5) अनुजा कोळी सांगली
उत्कृष्ट बिगर गुणांकन प्राप्त बुद्धिबळ पटू
1)ओम मंडलिक कोल्हापूर 2)दिलीप सूर्यवंशी सांगली 3)सृष्टी कुलकर्णी कोल्हापूर 4)नितीन परीक इचलकरंजी 5)दयानंद पाटोळे कोल्हापूर
उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू
1)अभिजीत कांबळे सांगली 2)पियुष कदम शिरोळ
पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)साई प्रभू देसाई रत्नागिरी 2)अनय दोशी कोल्हापूर 3)मानस महाडेश्वर कोल्हापूर 4)प्रणव मोरे कोल्हापूर 5)अरिन कुलकर्णी कोल्हापूर 6)व्यंकटेश खाडे पाटील कोल्हापूर 7)पियुष माने सांगली 8)सर्वेंदू कुंभार इस्लामपूर 9)अथर्व कामशीकर बेळगाव 10)केशव सारडा सांगली
तेरा वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)राजदीप पाटील कोल्हापूर 2)अंशुमन शेवडे बेळगाव 3)अर्णव चव्हाण चिपळूण 4)सिद्धार्थ चौगुले कोल्हापूर 5)सौमित्र केळकर सांगली 6)अंशुल चुयेकर कोल्हापूर 7)मिहीर पिंपळकर सांगली 8)आरुष ठोंबरे कोल्हापूर 9)हर्ष धनवडे मिरज 10)योगदुर्म माने कोल्हापूर
सतरा वर्षाखालील उत्कृष्टु मुली
1)सारा हरोले सांगली 2)सारा मुल्ला सांगली 3) स्नेहल गावडे कोल्हापूर 4)संस्कृती सुतार नांदणी 5)सिद्धी बुबणे नांदणी 6)सृष्टी जोशीराव कोल्हापूर 7) सृष्टी पवार शिरपेवाडी 8)हर्षिता पडवळे गगनबावडा 9)वेदिका मदने कोल्हापूर 10)निरजा शेलार बालिंगा
नऊ वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)दिविज कत्रुट कोल्हापूर 2)शौर्य नांगरे मिरज 3)प्रज्ञेश घोरपडे सातारा 4)विहान अस्पतवार सिंधुदुर्ग 5)अवनीश जितकर कोल्हापूर 6)पृथ्वीराज पाटील सांगली 7)सुमय खोत सांगली 8)प्रथमेश पवार सांगली 9)अद्वय पाटील कोल्हापूर 10)रुद्र वीर पाटील गडहिंग्लज
सात वर्षाखालील उत्कृष्ट बुद्धिबळपटू
1)अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर 2) अथर्वराज ढोले कोल्हापूर 3)अवनीश पाटील कोल्हापूर 4)आरुष पाटील गडहिंग्लज 5) ध्रुव जाजु इचलकरंजी 6)रिधान करवा इचलकरंजी 7)तनिषा चौगुले कोल्हापूर
अकरा वर्षाखालील उत्कृष्ट मुली
1)सिद्धी कर्वे जयसिंगपूर 2)गार्गी गुरव इचलकरंजी 3)अवनी कुनाळे सांगली 4)समंथा पाटील बेळगाव 5)आयुषी घोरपडे सातारा 6)विवांता पाटील बेळगाव 7)धनश्री पोर्लेकर इचलकरंजी 8)माधवी देशपांडे सांगली