
no images were found
कोल्हापुरात भव्य वयोगट व खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा
कोल्हापूर :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने कोल्हापुरात सोमवार दिनांक 17 जून रोजी कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय दिव्यांग बुद्धिबळपटू कै. शैलेश नेर्लीकर स्मृती अकरा वर्षाखालील , सतरा वर्षाखालील व खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा होणार आहेत.
राम गणेश गडकरी हॉल न्यू एज्युकेशन सोसायटी कॅम्पस,पेटाळा,कोल्हापूर येथे होणाऱ्या या स्पर्धा कोल्हापूर चेस ॲकॅडमीने आयोजित केली आहे. अकरा वर्षाखालील मुलेमुली, सतरा वर्षाखालील मुलेमुली व खुला गट अशा तीन स्वतंत्र गटात होणाऱ्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकूण सात फेऱ्यात होणार आहेत.
तिन्ही गटात मिळून एकूण 64 हजार रुपयाची रोख बक्षीसे व 50 चषक आणि 30 मेडल्स बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे.एकूण 121 बक्षिसे आहेत. यापैकी खुल्या गटासाठी रोख 32000 ची बक्षिसे व चषक दिले जाणार आहे.तर 11 व 17 वर्षाखालील मुलामुलींच्या प्रत्येक गटात 16,000 रुपयाची रोख बक्षिसे व चषक आणि मेडल्स बक्षीस म्हणून ठेवले आहे.खुल्या गटात विजेत्यास रोख सात हजार रुपये व चषक, उपविजेत्यास रोख पाच हजार रुपये व चषक तर तृतीय क्रमांक रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले जाणार आहे.एकूण 21 मुख्य बक्षिसे आहेत त्याशिवाय साठ वर्षावरील जेष्ठ उत्कृष्ट बुद्धिबळपटू, उत्कृष्ट महिला बुद्धिबळपटू, उत्कृष्ट बिगरगुणांकित बुद्धिबळपटू, उत्कृष्ट दिव्यांग बुद्धिबळपटू या प्रत्येक गटात पाच बक्षीसे ठेवले आहेत.अकरा व सतरा वर्षाखालील मुला मुलींच्या गटात प्रत्येक गटात विजेत्याला रोख पाच रुपये व चषक,उपविजेत्यास रोख तीन हजार रुपये व चषक, तृतीय क्रमांकास रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. मुख्य दहा बक्षिसे आहेत. याशिवाय सात वर्षाखालील,नऊ वर्षाखालील,तेरा वर्षाखालील,पंधरा वर्षाखालील मुलांना व उत्कृष्ट मुली या प्रत्येक गटात 10 बक्षिसे रोख,चषक व मेडल्स स्वरूपात दिली जाणार आहेत.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी खुल्या गटासाठी साडेचारशे रुपये तर अकरा व सतरा वर्षाखालील गटातील मुलांना चारशे रुपये प्रवेश शुल्क ठेवले आहे.तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी प्रवेश शुल्क आरती मोदी 8149740405 यांच्याकडे गुगल पे करून गुगल फॉर्म रविवार दि. 16 जून संध्याकाळी पाच वाजेपर्यत भरावयाचा आहे.गुगल फॉर्म लिंक पुढीलप्रमाणे https://forms.gle/4jJnHegoudMjtEMy5 अधिक माहितीसाठी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा 1)मनीष मारुलकर – 9922965173 , 2) उत्कर्ष लोमटे – 9923058149 , 3) प्रीतम घोडके 8208650388 , 4) धीरज वैद्य -9823127323 , 5) आरती मोदी – 8149740405 , 6) रोहित पोळ – 9657333926
सोमवार दिनांक 17 जून रोजी सकाळी नऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर साडेनऊ वाजता स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल.सर्व खेळाडूंची दुपारच्या जेवणाची व्यवस्था स्पर्धा स्थळी मोफत केली आहे.असे मुख्य स्पर्धा संयोजक आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.