Home सामाजिक फ्लिपकार्टने आयोजित केला सौंदर्यप्रसाधनांचा सर्वांत मोठा महोत्सव: ग्लॅम अप फेस्ट २०२४  

फ्लिपकार्टने आयोजित केला सौंदर्यप्रसाधनांचा सर्वांत मोठा महोत्सव: ग्लॅम अप फेस्ट २०२४  

7 second read
0
0
40

no images were found

फ्लिपकार्टने आयोजित केला सौंदर्यप्रसाधनांचा सर्वांत मोठा महोत्सव: ग्लॅम अप फेस्ट २०२४  

 

मुंबई – फ्लिपकार्टने बहुप्रतिक्षित ग्लॅम अप फेस्टची घोषणा केली आहे. हा महोत्सव मुंबईतील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे १४ जून २०२४ला होणार आहे. ग्लॅम अप हा सौंदर्यप्रसाधनांचा सगळ्यात मोठा उत्सव आहे. या महोत्सवात ३५०० हून अधिक ब्युटी इन्फ्ल्युएन्सर्स भाग घेतील आणि 70 पेक्षा अधिक सर्वोत्कृष्ट ब्रँड्स असतील. ग्लॅम अप फेस्टमुळे लाईफस्टाईल इन्फ्ल्युएन्सर्सना एक मोठं व्यासपीठ मिळेल. त्याचा वापर करून ते ब्युटी आणि लाईफस्टाईल उत्पादनं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॉलोअर्सपर्यंत पोहोचवू शकतील.

फ्लिपकार्टच्या ग्लॅम अप फेस्टमध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड एकाच छताखाली उपलब्ध होतील. या महोत्सवात तापसी पन्नू, सिद्धांत चतुर्वेदी, रोहित सराफ, अदा शर्मा, आणि पश्मिना रोशन यांच्यासारखे भारतातील. लोकप्रिय सेलिब्रिटी उपस्थिती नोंदवतील. सेलिब्रिटीज आणि इन्फ्ल्युएन्सर्स विविध ब्रँड बुथमध्ये जाऊन फ्लिपकार्टच्या एआर आणि व्हीआर यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्हर्च्युअल ट्राय ऑन, व्हीडिओ कॉमर्स, स्किन अनालायझर्स, या साधनांच्या वापर करून उत्पादनांची माहिती घेतील. त्यामुळे शॉपिंगचा अनुभव आणखी समृद्ध होईल. या महोत्सवात लॉरियल, लॅकमे, मेबिलिन, शुगर कॉस्मॅटिक्स, मामाअर्थ, रिबॉक, रेव्हलॉन, न्युट्रोजिना, आणि सेटाफिल या ब्रँड्सचे एक्सपिरेन्शिअल झोन असतील. त्याच्या माध्यमातून ते नवीन लाँच झालेली उत्पादनं, ठेवणीतली उत्पादनं आणि विविध डील्स दाखवतील. १४ जूनला दिवसभर हा महोत्सव सुरू राहणार असून त्यात नवीन ब्रँड लाँच, इंटरॅक्टिव्ह अक्टिव्हिटीझ, डेमो, प्रॉडक्ट ट्रायल्स, तसेच फोटो आणि व्हीडिओ स्टेशन्स असतील.  या महोत्सवाला फ्लिपकार्टचे ज्येष्ठ अधिकारीही उपस्थित असतील. एफएमसीजी आणि जनरल मर्चंटाईजचे प्रमुख मंजरी सिंघल, कस्टमर एक्सपिरियन्स अँड रिकॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सप्लाय चेनचे प्रमुख हेमंत बद्री,  तसेच चीफ प्रॉडक्ट आणि टेक्नॉलॉजी ऑफिसर जेयन्द्रन वेणुगोपाल यांचा समावेश आहे. ब्युटी आणि पर्सनल केअर इंडस्ट्री याबद्दल ते अधिक माहिती देतील.

ग्लॅम अप फेस्ट २०२४ बद्दल बोलताना एफएमसीजी आणि जनरल मर्चंटाईजचे प्रमुख मंजरी सिंघल म्हणाल्या, “ग्लॅम अप फेस्टच्या दुसऱ्या आवृत्तीत फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव आणखी समृद्ध करत आहे. या महोत्सावत ३५०० इन्फ्ल्युएन्सर्स असतील, एकूण ४० कोटी ग्राहकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि लाखो लोक ते पाहतील. ७० लोकप्रिय ब्रँडमुळे सध्याचे ट्रेंड पाहणे, नवीन ब्रँड शोधणे या गोष्टी करता येतीलच त्याचबरोबर ग्लॅम अप या अपवर आधारित अनेक इंटरॅक्टिव्ह गोष्टी करता येतील. ग्राहकांचे समाधान आणि आनंद या गोष्टींना आम्ही फ्लिपकार्टमध्ये कायमच प्राधान्य दिलं आहे. ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी विविध उत्पादनं उपलब्ध करून दिल्यामुळे ही मूल्यं आणखी अधोरेखित झाली आहेत. भारतीय ग्राहकांचा ऑनलाईन शॉपिंगमध्यो वस्तू कशा बघतात यात आम्ही क्रांती घडवण्यास कटिबद्ध आहोत. यामुळे ग्राहकांना अगदी सहज शॉपिंग करता येईल.”

अत्याधुनिक तंत्रज्ञान, भारतभर सप्लाय चेनचे नेटवर्क यांमुळे सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात फ्लिपकार्ट नवे आयाम प्रस्थापित करत आहे. ग्लॅम अप शॉपिंगचा मोठा उत्सव आहे. त्यामुळे ब्युटी, मेकअप, ग्रुमिंग या क्षेत्रात फ्लिपकार्ट कायमच आघाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. या महोत्सवानंतर ग्लॅम अप सेल १४ ते १७ जून दरम्यान असेल. या सेलमध्. सौंदर्यप्रसाधनांवर चांगल्या ऑफर्स मिळतील. या सेलमुळे किफायतशीर दरात त्यांची आवडती उत्पादनं हवं त्या ठिकाणी मिळतील.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …