
no images were found
स्वयंसिद्धा व डॉ. व्ही. टी .पाटील फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : स्वयंसिद्ध व डॉक्टर व्ही. टी .पाटील फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त यंदाचे पुरस्कार स्वयं सिद्धाच्या कार्यकारी संचालिका अध्यक्षा जयश्री गायकवाड यांनी जाहीर केले. डॉक्टर शोभना तावडे मेहता आरोग्यम् धनसंपदा पुरस्कार डॉक्टर सुभाष आठले यांना तर जिनेन्द्र शिरोळकर यांच्या स्मरणार्थ गुरुवर्य पुरस्कार प्रकाश गाताडे यांना जाहीर करण्यात आला .१०हजार रुपये व मानपत्र असे स्वरूप आहे. कै. कु.विभावरी आपटे पुरस्कार इचलकरंजीच्या प्रीती पटवा यांना जाहीर झाला. बारा हजार रुपये व मानपत्र असे स्वरूप आहे. राजीव हुजूर बाजार यांचे स्मारणार्थ जीवन सारथी पुरस्कार अब्दुल्लाख येथील संदीप पाटील यांना जाहीर झाला. त्याचे स्वरूप दहा हजार रुपये व मानपत्र असे आहे. राजलक्ष्मी पुरस्कार शाहुवाडी येथील सामूहिक महिला बचत गट व गोठणे येथील केदारलिंग महिला बचत गटाला विभागून दिला जाणार आहे पाच हजार रुपये व मानपत्र असे स्वरूप आहे. कै. सौ .मानिकताई जामसांडेकर महिला सबलीकरण प्रकल्प माणिक मोती अर्थसहाय्य हर्षदा कदम यांना दिले जाणार आहे. वितरण वर्धापन दिन कार्यक्रम शनिवारी दिनांक १५ दुपारी तीन वाजता राजश्री शाहू स्मारक भवनात घेण्यात येणार आहे. अशी माहिती स्वयंसिद्धाच्या कार्यकारी संचालिका जयश्री गायकवाड यांनी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी दिली .यावेळी सौम्या तिरोडकर अध्यक्ष डॉ. व्हीं.टी .पाटील फाउंडेशन,अंजली घोरपडे, दीप लक्ष्मी राऊत ,जयश्री शिरोळकर, सुप्रिया देशपांडे ,जागृती निगडे, कविता बडे, मंदा आचार्य ,कविता देसाई ,प्रीती साळुंखे आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर व्ही. टी .पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष सौम्या तिरोडकर ,अंजली घोरपडे आदी उपस्थित होत्या