no images were found
युवा’ स्टेशनरीने संपादित केले ‘Sony YAY!’ वरील ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’- या लोकप्रिय कार्यक्रमाचे लायसन्सिंग हक्क
कोल्हापूर : नवनीत एज्युकेशनच्या ‘युवा’ या ब्रँडतर्फे ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’ या आघाडीच्या ॲनिमेटेड सीरिजसोबत सहयोग केल्याची घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. ‘Sony YAY!’ साठी झिलम ॲनिमेशनतर्फे लायसन्स देण्यात आलेल्या या ॲनिमेटेड विनोदी कार्यक्रमाने आपल्या मनोरंजक व विनोदी कथानकामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
‘ओगी’ हा लोभस बोका एक आयकॉन झाला आहे आणि या बोक्याने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. भौगोलिक सीमा आणि भाषांची मर्यादा ओलांडून सर्व वयोगटातील प्रेक्षकांमध्ये हा बोका लोकप्रिय आहे. ओगीच्या प्रेमळ स्वभावाने आणि सहज अनुभवांकडे मुले आकर्षित होतात. त्यामुळे मैत्रीच्या जगात हा बोका ही सर्वात आवडती व्यक्तिरेखा झाली आहे. या व्यक्तिरेखेचे यश केवळ टीव्ही स्क्रीनपुरते मर्यादित नाही तर ओगी हा एक साथीदार झाला आहे, एक असा मित्र जो मुलांना आपल्या रोजच्या जगण्यात हवाहवासा वाटतो.
‘युवा’ ने ‘Sony YAY!’ कडून ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’ चे लायसन्सिंग हक्क प्राप्त केले आहेत. या सहयोगाची व्याप्ती जम्बो-साइझ व नियमित नोटबुक्स, कलरिंग व ॲक्टिव्हिटी बुक्स, कॉम्बो किट्स आणि एक्झाम बोर्ड इत्यादी विविध स्टेशनरी उत्पादनांपर्यंत विस्तारणार आहे.
‘युवा’ आणि ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’ यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या माध्यमातून स्टेशनरीच्या जगात आनंद आणि कल्पकता रुजविण्याचे उद्दिष्ट आहे. या सीरिजचे चाहते आणि ग्राहकांना उत्पादनांची रोमांचक श्रेणी उपलब्ध होणार आहे आणि या उत्पादनांवर त्यांच्या आवडत्या व्यक्तिरेखा असणार आहेत.
“जगभरातील प्रेक्षकांच्या कल्पनांना गवसणी घालणाऱ्या ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’ या कार्यक्रमासोबत हातमिळवणी करताना आम्ही अत्यंत उत्साहात आहोत.”, असे ‘युवा’चे चीफ स्ट्रॅटजी ऑफिसर अभिजीत सान्याल म्हणाले. “हा सहयोग म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण व खिळवून ठेवणाऱ्या उत्पादनांसह आमच्या ग्राहकांसाठी नावीन्य आणि आनंद घेऊन येण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे द्योतक आहे. एका यशस्वी भागीदारीसाठी आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. या भागीदारीने आम्ही स्टेशनरीचे आणि या लोकप्रिय ॲनिमेटेड सीरिजचे चाहते असलेल्यांच्या मनात एक कायमस्वरुपी ठसा उमटवणार आहोत.”
‘Sony YAY!’चे मार्केटिंग, कम्युनिकेशन्स आणि ओएपी हेड सुजॉय रॉय बर्धन म्हणाले, “मुले आणि त्यांचे आवडते टून्स यांच्यातील घट्ट नात्यांची आम्हाला जाणीव आहे. मुलांच्या कल्पना आणि कल्पकता यांना आकार देण्यात ॲनिमेटेड व्यक्तिरेखा महत्त्वाची भूमिका निभावतात. ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे आणि ‘युवा’सोबत आम्ही केलेल्या सहयोगाच्या माध्यमातून स्टेशनरी उपलब्ध करून देण्यासोबतच आनंदाच्या क्षणांची पखरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीमुळे आपल्या आवडत्या व्यक्तिरेखेसोबत संवाद साधण्याचे रोमांचक मार्ग उपलब्ध होणार आहेत आणि ‘ओगी अँड द कॉक्रोचेस’ची जादू आणि विनोद यामुळे स्टेशनरी वापरण्याचा अनुभव अधिक आनंददायी होणार आहे.”