no images were found
हेल्थ रेनिसन्स थेरपीमुळे वेदनारहीत जीवन जगणे सोपे: डॉ. गौरी खंडेराव
कोल्हापूर/ प्रतिनिधी: फिजिओथेरपीमध्ये एक्वा थेरपी आणि हायड्रोथेरपीचे महत्त्व कोरोना नंतर वाढले आहे. पाण्यामध्ये शरीराच्या हालचाली करून अनेक शारीरिक व्याधी तसेच मानसिक आजारांवर मात करता येते. त्याचप्रमाणे फिजिओथेरपीची व्याप्ती वाढली असून यामध्येच चुंबकीय शक्तींचा वापर करून पीइएमएफ या आधुनिक तंत्रज्ञानाने निष्क्रिय शरीर अवयवांचे पुनर्जीवन करता येते. ओझोन थेरपी, होमिओपॅथी या उपचार पद्धतींनी पार्किन्सन, पॅरालिसीस अशा अनेक जर्जर आजारांवर उपचार करणे आता सोपे झाले आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृती प्रमाणे उपचार पद्धती अवलंबली जाते. स्वमग्न मुलांना अशा प्रकारच्या उपचार पद्धतीमुळे पुन्हा समाजात आणता येईल. आणि प्रत्येक व्यक्तीला वेदनारहित जीवन जगता येईल असे प्रतिपादन इन्फिनिटी प्लस च्या प्रमुख डॉ. गौरी खंडेराव यांनी केले. हेल्थ रेनीसन्स थेरेपी म्हणजेच आरोग्य पुनर्जीवन उपचार पद्धतीबद्दल मार्गदर्शन करताना त्या कोल्हापुरात बोलत होत्या. मुंबई येथील इन्फिनिटी प्लस हे आता कोल्हापुरातील हीलिंग टच या क्लिनिकशी जोडले जाणार आहे. याचा कोल्हापूरकरांना निश्चितच फायदा होणार आहे. यानिमित्ताने आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. हीलींग टच क्लिनिकचे प्रमुख डॉ. ऋषिकेश जाधव यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले ” मेडिकलच्या क्षेत्रात फिजिओथेरपीस्टची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मेंदूचे विकार, पाठदुखी, कंबरदुखी, मतिमंद मुले, लहान मुलांसाथी,दम्याचे रुग्ण, हृदयरोग, अर्धांगवायू, खेळाडूंसाठी उपचार, वृद्धांसाठी, संधिवात, महिलांचे आरोग्य, गरोदरपणात आधी आणि नंतर तसेच रोजच्या रोज आरोग्याचे संतुलन राखण्यासाठी, फिटनेस ठेवण्यासाठी आणि ममानसिक आजारांमध्येही अशा प्रत्येक बाबतीत फिजिओथेरपीची आवश्यकता असते. म्हणजे यावरून असे सिद्ध होते की वैद्यकीय क्षेत्र हे फिजिओथेरपीने व्यापलेले आहे. फिजिओथेरपीमध्ये विशेषीकरण निर्माण झाले असून आता एक्वा थेरपीचे महत्त्व अधोरेखित झालेले आहे.
यावेळी सतीश पोळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.