Home राजकीय श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

0 second read
0
0
117

no images were found

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

कोल्हापूर : कॉग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज मुंबई येथे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.

कोल्हापूर लोकसभा हा पारंपारिक ठाकरे गटाचा मतदारसंघ आहे. मात्र, शाहू महाराजांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ही शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडली होती. कोल्हापुरात गांधी मैदानामध्ये झालेल्या शिव शाहू निर्धार सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित करत शाहू महाराजांच्या विजयासाठी आवाहन केले होते. काँग्रेसकडून शाहू महाराज यांनी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा एक लाख 54 हजारांवर मतांनी पराभव केला. या पार्श्वभूमीवर शाहू महाराज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, रश्मी उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …