Home Uncategorized सानिया मिर्झाची बॉलिवूडमध्ये एंट्री ?

सानिया मिर्झाची बॉलिवूडमध्ये एंट्री ?

0 second read
0
0
18

no images were found

सानिया मिर्झाची बॉलिवूडमध्ये एंट्री ?

भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा ही गेल्या काही महिन्यांपसून बरीच चर्चेत आहे. पण ते तिच्या खेळामुळे नव्हे तर खासगी आयुष्यात होणाऱ्या घडामोडींमुळे. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिका यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर शोएबने तिसरं लग्नही केलं. यामुळे बराच गदारोळ माजला आणि सानियाच्या खासगी आयुष्यावरही खूप फोकस होता. मात्र तिने ही परिस्थिती अतिशय समजूतदारपणे आणि संयतपणे हाताळली. ती तिच्या आयुष्यात मूव्ह ऑन झाली असून, तिच्या लाडक्या लेकासोबत वेळ घालवत निवांत आयुष्य जगत आहे.
सानिया मिर्झा हिने नुकतीच कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये हजेरी लावली. कपिल शर्माचा हा शो आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आहे. या शोमध्ये सानिया हिच्यासोबतच मेरी कोम आणि सायना नेहवाल या दोघीही उपस्थित होत्या. या शोमध्ये त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. शोमधील संभाषणादरम्यान, सानियाने नवीन लव्ह इंटरेस्ट शोधण्याबद्दल चर्चा केली होती, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले गेले. यावेळी कपलि शर्माने सानियाला तिच्या एका जुन्या मुलाखतीची आठवण करून दिली. त्यामध्ये शाहरूख खान म्हणाला होता की, तिच्या बायोपिकमध्ये मला सानियाच्या प्रियकराची भूमिका करायला आवडेल.
त्यावर सानियाने दिलेल्या उत्तराची सध्या बरीच चर्चा सुरू आहे. सानिया म्हणाली, पण आधी मला लव्ह इंटरेस्ट शोधावा लागेल. जर तुझ्यावर बायोपिक बनत असेल तर तुला त्यात स्वत: काम करायला आवडेल की इतर अभिनेत्रींनी तुझी भूमिका साकारलेली आवडेल ? असा प्रश्न कपलिने सानियाला विचारला. या प्रश्नावर सानियाने अतिशय मजेशीर उत्तर दिले. ती म्हणाली – “जर शाहरुख खान माझ्या प्रियकराच्या भूमिकेत असेल तर मला काम करायला आवडेल. पण जर अक्षय कुमार माझा लव्ह इंटरेस्ट बनला तर मला माझ्या बायोपिकमध्ये काम करायला अधिक आवडेल.”
सानियाचं हे उत्तर ऐकून शोमध्ये उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरा हसू लागले. य़ावेळी बोलताना सानिया अतिशय कॉन्फिडंट दिसत होती. तिच्या हजरजबाबीपणामुळे प्रेक्षकही खूप इंप्रेस झाले, तिच्या उत्तरांनी लोकांवर एक छाप सोडली. शोएब मलिक आणि सानियाचे 2010 साली लग्न झाले होते, त्यांना एक मुलगाही आहे. मात्र आता विभक्त झाल्यानंतर सानिया आता तिच्या मुलाचा एकटने, समर्थपणे सांभाळ करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे

शिवछत्रपती पुरस्कार सोहळा ऐतिहासिक असेल- क्रीडामंत्री भरणे   पुणे : अनेक वर्षांनंतर स…