
no images were found
पंकजाताई जिंकल्या नाही तर जीव देईन म्हणणाऱ्या सचिनचा अपघाती मृत्यू,?
पंकजा मुंडे हरल्या तर आत्महत्या करेन असं सांगणाऱ्या एका कार्यकर्त्याचा खरंच अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लातुरात ही घटना घडली. लातूर जिल्ह्यातील एस आर या गावातील सचिन मुंडे या कार्यकर्त्याने पंकजा मुंडे निवडून आल्या नाही तर मी आत्महत्या करेन, असं सांगितलं होतं. या संबंधिचा व्हिडिओ २६ मे राजी त्याने टाकला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला होता. मात्र, काल रात्री त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने जिल्ह्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी सचिनने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला तर मी आत्महत्या करेन, अशा स्वरूपाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. बीड लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर काही ठिकाणी संताप व्यक्त करण्यात आला. दोन दिवसानंतर वातावरण निवळले आहे. पंकजा मुंडे यांनीही कार्यकर्त्यांना आवाहन करत शांत केलं होतं. मात्र, काल एक घटना घडली आणि पुन्हा उलट सुलट चर्चेला उधाण आलं आहे.