
no images were found
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत‘चांगला आणि वाईट स्पर्श’ बाबत मार्गदर्शन
कोल्हापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या पुढाकारातून ‘चांगला आणि वाईट स्पर्श’ बाबत माईसाहेब बावडेकर विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती के. बी . अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सचिव प्रितम पाटील यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 आणि त्यामधील तरतुदी आणि मुलींनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी मुलींनी आपल्या हक्काबाबत जागरुक राहून वेळीच घडणाऱ्या घटनांबाबत पालक व शिक्षकांना कल्पना दयावी, असे सांगितले.
सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमिता कुलकर्णी यांनी मुलींना चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा याबद्दल मार्गदर्शन केले.निभर्या पथकाच्या प्रमुख मेघा पाटील यांनी पोक्सो कायदयाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.