
no images were found
महापालिकेच्यावतीने पावसाळयामध्ये वीजेचा झटका लागू नये याकरीता नागरिकांना सुचना
कोल्हापूर : नागरिकांच्या सोईस्तव सार्वजनीक सुरक्षिततेकरीता महापालिकेच्यावतीने महापालिका कार्यक्षत्रातील इमारती, सार्वजनिक ठिकांणी प्रकाश व्यवस्थेकरीता उभा केलेल्या विद्युत खांबावरुन विज पुरवठा केला जातो. यासाठी महापालिका व महावितरण कंपनीकडून प्रकाश व्यवस्थेकरीता थ्री फेज 440 व्होल्टचा विज पुरवठा विद्युत खांबावर केलेला असतो. त्यामुळे नागरीकांनी पावसाल्यात सुरक्षितेच्या दृष्टिकोणातून योग्यती दक्षता घ्यावी. नागरीकांनी पथ दिवे, खांब व त्यांच्याशी निगडीत विद्युत यंत्रणेची कोणत्याही प्रकारची छेडेछाड, विद्युत खांबांना तसेच फिडर पिलेरला स्पर्श करु नये. खांबाला जनावरे बांधने, पथ दिवे खांबावरून विना परवाना विज घेणे, कपडे वाळत घालण्यासाठी विद्युत खांबांना तारा बांधणे, बांधकामाकरीता पथ दिव्याच्या खांबांचा वापर करणे, पथ दिवे असलेल्या विद्युत खांबावर होर्डींग्स,फ्लेक्स बांधणे, विद्युत खांबांनवरुन केबल तार ओढणे अशा प्रकारचे कोणतेही कृती करण्यात येवू नये. तसेच लहान मुलांना विद्युत खांबापासून दुर ठेवावे. पावसाळयामध्ये वादळीवारे व अतिवृष्टीमुळे विद्युत खांबावरील तारा तुटून रस्त्यावर किंवा अन्य ठिकाणी पडली जाण्याची शक्यता असते यामुळे नागरीकांनी विजेचा झटका लागू नये अथवा कोणती हानी होऊ नये याकरीत दक्षता घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.