no images were found
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
कोल्हापूर (प्रतिनिधी)- भारतासह अन्य देशांमध्ये आतंकवादाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी भारत सरकारला हवा असलेला डॉ. झाकीर नाईक याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहेत. मोहम्मद झीशान नावाच्या मुस्लीम युवकाने पाठवलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना झाकीर नाईक याने मंदिराच्या कामात सहभाग हे ‘शिर्क’ म्हणजे इस्लामनुसार महापाप आहे. मंदिर वा चर्च यांमध्ये जाण्यापेक्षा हजारोंना मारणार्या शस्त्रे बनवणार्या कारखान्यात जाणे चांगले, कोणत्याही मंदिर किंवा चर्च बनवणार्या कंपनीत काम करणे हे इस्लामनुसार ‘हराम’ आहे. खूप मोठे महापाप आहे, अशी उत्तरे दिली आहेत. ‘हुडा टी.व्ही.’ नावाच्या यू-ट्यूब चॅनलवर झाकीर नाईक याचा हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. तरी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करावी, या मागणीचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्वीकारले.
या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सुनील सामंत, महाराज प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी आणि गौतमेश तोरस्कर, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, भ्रष्टाचार निर्मूलन जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अभिजित पाटील, सतीश कोरवी, सचिन पवार, राहुल जानवेकर, सागर रांगोळी, रामभाऊ मेथे उपस्थित होते.
मोहम्मद झीशानला दिलेल्या उत्तरात डॉ. झाकीर नाईक म्हणातो, मंदिर किंवा चर्च यांच्या उद्घाटनाला जाण्यापेक्षा, एखादा राजकारणी हजारो निष्पाप नागरिकांची हत्या करणार्या दहशतवाद्यांची शस्त्रे बनवून देणार्या कारखान्याच्या उद्घाटनाला गेला, हे निश्चित अधिक चांगले आहे. झाकीर नाईक हा ‘इस्लामी धर्मोपदेशक’ असल्यामुळे त्याच्या भाषणांतून जगभरातील धर्मांध मुसलमान प्रेरणा घेतात.
* या प्रसंगी करण्यात आलेल्या मागण्या
१. अशा प्रकारे वक्तव्ये करून झाकीर नाईक मुसलमानांना हिंदु आणि ख्रिस्ती यांच्या विरोधात भडकावत जाणीवपूर्वक धार्मिक तेढ, घृणा, द्वेष, मत्सर आणि शत्रुत्व निर्माण करत आहे. तरी झाकीर नाईक याला भारताच्या स्वाधीन करावे, अथवा मलेशियात त्याच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी केंद्र सरकारने मलेशिया सरकारवर दबाव आणावा.
२. ‘संयुक्त राष्ट्र संघा’त झाकीर नाईक याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी मागणी करावी.
३.‘झाकीर नाईक’ आणि ‘इस्लामिक रिसर्च फाउंडेशन’ यांचे फेसबूक, ट्वीटर, इस्ट्राग्राम आदी सर्व सामाजिक माध्यमांवरील सर्व अकाऊंट त्वरित बंद करण्यात यावीत.
४. ही सोशल मिडीया अकाऊंट इतकी वर्षे का बंद करण्यात आली नाहीत ? याला कोण जबाबदार आहे? त्या व्यक्ती आणि ‘फेसबुक’सारख्या कंपन्या यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई करावी.