no images were found
पुण्यात दारुड्या बापाने मुलीला गोळी घातली
पुणे : पुण्यात दारुड्या बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलीला गोळी घातल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली आहे. पुण्यातील नऱ्हे येथे शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही ही धक्कादायक घटना घडली आहे. पांडुरंग तुकाराम उभे (वय ३८) असे बापाचे नाव आहे. तो बांधकाम व्यवसायिक आहे.
पांडुरंग उभे याच्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. सध्या त्याचा व्यवसाय मंदीमध्ये असल्याने पांडुरंग आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे आधीच दारुचे व्यसन असलेल्या उभचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. शुक्रवारी रात्री तो दारू पिऊन घरी आला. त्यावरून त्याच्यामध्ये आणि पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तुमच्यामुळे मला बाहेरच्या लोकांचा मार खावा लागतो. आज तुम्हाला संपवून टाकतो, असं म्हणत उभे याने आपली परवाना असलेली बंदूक पत्नीच्या दिशेने रोखली.
आई-वडिलांमध्ये कडाक्याचे भांडण सुरू असल्याचे पाहून जवळच उभी असलेली ८ वर्षाची राजनंदिनी ओरडतमध्ये आली. ‘पप्पा मम्मीला मारू नका’ अशी विनवणी राजनंदिनी करत होती. मात्र दारुच्या नशेत धुंद असलेल्या निर्दयी बापाने कसलीही दया न दाखवता थेट राजनंदिनीवर गोळी झाडली. यात राजनंदिनी गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नराधम बापाच्या विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटकही केली आहे.