no images were found
महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात विशेष स्वच्छता मोहिम
कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत व मान्सूनपुर्व तयारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दि.24 मे ते 4 जून विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त आुयक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.
यामध्ये दि.24 ते 31 मे 2024 या कालावधीत सर्व आरोग्य निरिक्षक यांनी शहरातील सर्व सार्वजनिक शौचालय व मुतारी यांची सफाई कर्मचा-यांमार्फत स्वच्छता करणेची मोहिम राबविण्यात येणार आहे. दि.25 मे ते 1 जून 2024 या कालावधीत सर्व सर्व वॉर्डमध्ये पडलेले टायर जप्त करणे, पाणी साठून डास उत्पत्ती होणारे साहित्य जसे फुटके माट, कुंडया पाणी साचणारे अन्य साहित्य यांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. दि.27 मे ते 3 जून 2024 या कालावधीत खाजगी खुल्या जागा, मोकळया जागेची स्वत: मालकांनी स्वच्छता करुन घेणेबाबत नोटीसा लागू करण्यात येणार आहे. संबंधीत मालकाकडून खुल्या जागेची स्वच्छता न झाल्यास विहित सेवा शुल्क आकारणी करुन महापालिकेचे कर्मचारी तेथे स्वच्छतेसाठी लावून स्वच्छता करुन घेण्यात येणार आहे. दि.28 मे ते 4 जून 2024 या कालावधीत महापालिकेच्या मालकीच्या इमारतीच्या टेरेसवर पाणी साचून डास उत्पन्न होऊ नये याकरीता सर्व टेरेसची स्वच्छता करण्यात येणार आहे.