no images were found
धीरज धूपारच्या फॅशनचा ‘रब से है दुआ’ लग्नसोहळ्यामध्ये झगमगाट
झी टीव्हीवरील ‘रब से है दुआ’ने आपल्या रोचक कथानकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही मालिका नातेसंबंधांचे नाजूक डायनॅमिक्स उलगडून पाहत असून सामाजिक नियमांनाही आव्हान देत आहे. ह्या मालिकेने एका रंजक प्रवासाला सुरूवात केली असून यातील प्रमुख कलाकार आपल्या नातेसंबंधांमध्ये नाट्यमय वळणे अनुभवत आहेत. सुभान, मन्नत आणि इबादत यांच्यावर प्रकाशाचा झोत असून अनुक्रमे धीरज धूपार, सीरत कपूर आणि येशा रूघानी ह्या भूमिका साकारत आहेत. सध्याच्या ट्रॅकमधून मन्नत आणि सुभान यांच्या बहुप्रतिक्षित लग्नासाठी अख्ख्या परिवाराचा उत्साह दिसून येत आहे. मात्र, फरहानसोबत पळून जाण्याचा मन्नतच्या प्रयत्न तिची बहिण आणि खास दोस्त इबादतसाठी त्रासदायक ठरतो कारण मन्नत तिचा हा निर्णय बदलण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या मते फरहान हा मन्नतसाठी योग्य जोडीदार नाहीये.
ह्या मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू असताना सगळेच कलाकार अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी पोशाखांमध्ये सजले होते. आपल्या अचूक फॅशन सेन्ससाठी मानल्या जाणाऱ्या धीरज धूपारने आपल्या व्यक्तिरेखेच्या पोशाखामध्ये आपल्या खास स्टाईलाचाही समावेश करण्याचे ठरवले. लग्नामधील विभिन्न सोहळ्यांमध्ये धीरज अतिशय स्टायलिश आणि उजळ पोशाखांमध्ये दिसून येईल. प्रत्येक दृश्यामध्ये धूपार सहजपणे आपली फॅशन दाखवून देईल आणि त्यामुळे ह्या मालिकेचे सौंदर्य निश्चितच वाढेल. त्याच्या निवडी ह्या त्याच्या व्यक्तिमत्त्वालाच नव्हेत तर एकूणच लग्नसोहळ्याच्या सौंदर्यामध्ये भर टाकणाऱ्या आहेत.
धीरज म्हणाला, “एक अभिनेता असल्यामुळे मला माझे लूक्स आणि स्टाईल यांच्यासोबत प्रयोग करण्याची संधी मिळते. ह्या मालिकेतील लग्नाच्या ट्रॅकमुळे मला सुभानच्या व्यक्तिरेखेमध्येही हे करता येत आहे. लग्नसोहळे, एकूणच रंगांची उधळण आणि उजळपणासह मला विभिन्न रंग, पोत आणि लेयर्स माझ्या वॉर्डरोबमध्ये आणता येत आहेत. मग ते बंदगळा असोत आणि शेरवानी किंवा डॅपर सूट्स, मी स्टायलिस्टसोबत काम करून अगदी खास पोशाख निवडले आहेत. माझ्या वॉर्डरोबच्या बाबतीत मी अगदी सक्रियपणे रूचि ठेवतो आणि जेव्हा माझे चाहते सोशल मीडियावर माझ्या प्रत्येक लूकची तारीफ करतात तेव्हा माझ्या प्रयत्नांची पोचपावती मला मिळते. त्यामुळे व्यक्तिरेखेकडे वेगळ्या पद्धतीने तर पाहिले जातेच पण प्रेक्षकांसाठीही सौंदर्यामध्ये भर पडते.”सुभान आणि मन्नत यांच्या लग्नसोहळ्याचा अख्खा परिवार आनंद घेत असताना काय मन्नतची खरी योजना पूर्ण होईल की इबादत आपल्या बहिणीला वाचवू शकेल?