
no images were found
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचा फोटो व्हॅट्सॲपच्या डी.पी.ला लावून मॅसेज करणा-यापासून सावधान
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांचा फोटो मोबाईल क्रमांक +94770700256 याच्या डी.पी.वर लावून मॅसेज करण्यात येत आहे. हा मोबाईल क्रमांक अधिकृत प्रशासक मॅडमचा अथवा महापालिकेचा नसून यावरुन आलेल्या मॅसेज पासून सर्वांनी सावध रहावे. या मोबाईलच्या व्हॅट्सॲपवरुन कोणत्याही प्रकारचा मेसेज आलेस त्याला प्रतिसाद देऊ नये असे आवाहन प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.