Home शैक्षणिक शिवाजी विद्यापीठात २७ पासून ‘रोबोटिक्स प्रशिक्षण” शिबीर

शिवाजी विद्यापीठात २७ पासून ‘रोबोटिक्स प्रशिक्षण” शिबीर

5 second read
0
0
38

no images were found

शिवाजी विद्यापीठात २७ पासून ‘रोबोटिक्स प्रशिक्षण” शिबीर

 
कोल्हापूर(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठ व आरएनटी रोबोटिक्स, कोल्हापुर यांचे संयुक्त विद्यमाने व एसयुके रिसर्च अॅन्ड डेवलपमेंट फाऊंडेशन यांच्या सहकार्याने सोमवार दि. २७ मे, २०२४ ते ०१ जून, २०२४ या कालावधीमध्ये “रोबोटिक्स प्रशिक्षण शिबीर” आयोजित केले आहे. सदर शिबिर हे १२ वर्षावरील शालेय विद्यार्थ्यांकरिता असून सकाळी ११ ते २ या वेळेत होणार आहे. आधुनिक जगाच्या स्पर्धेत टिकून राहावयाचे असल्यास रोबोटिक्ससारख्या विषयाची माहिती असणे आवश्यक झाले आहे. बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स, ३डी डिझाईनिंग व प्रिटिंग इत्यादी विषयावर आरएनटी रोबोटिक्सच्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व प्रात्यक्षिक होणार आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात करिअरच्या दृष्टीने STEM (Science, Technology, Engineering and Mathematics) यांचा वापर कसा करता येईल, याबाबतचेही मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच एकत्रित काम करत असताना एकमेकांच्या कल्पना समजून घेवून त्यामध्ये नाविन्यता आणण्यासाठी विचारविनिमय करण्याचीही संधी उपलब्ध होणार आहे.
एक आठवड्‌याच्या प्रशिक्षण शिबीरासाठी प्रशिक्षणार्थीना मर्यादित प्रवेश असून त्यांची फी उन्हाळी सुट्टीमध्ये सवलतीच्या दरात रूपये १८००/- आहे. प्रशिक्षणार्थीनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन प्रा. (डॉ.) एस.डी. डेळेकर, संचालक, नवोन्मेष यांनी केले आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन

शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिन   कोल्हापूर,(प्रतिनिधी):- शिवाजी विद्यापीठात शि…