no images were found
पालखी प्रदक्षिणाने उत्सवाची सांगता
कोल्हापूर – येथील शंकराचार्य पीठामध्ये उत्सवामध्ये स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. आज विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.
श्रीमद जगदगुरू आद्य शंकराचार्य यांचा २५३२ वा उत्सव पीठात सुरू आहे. या निमित्ताने आठवडाभर प्रवचन, कीर्तन, गायन व देवी भागवतचे आयोजन केले आहे. यामध्ये स्वामीजी आज करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास गेले होते. तेथे अभिषेक, देवीचे दर्शन असा विधी झाला. यावेळी सचिव शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.
दरम्यान, उद्या (बुधवारी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये वैदिक पुरस्कार राघव रामदासी, पुणे, सांस्कृतिक पुरस्कार गोविंद शास्त्री जोशी, सातारा, कीर्तनकार पुरस्कार शरद आंबेकर, हिंगोली, स्थानिक वैदिक पुरस्कार संदीप काजरेकर, कोल्हापूर, सामाजिक गौरव संभाजी ऊर्फ बंडा साळुंखे, कोल्हापूर, महिला कीर्तनकार अस्मिता अरुण देशपांडे, डोंबिवली, होतकरू विद्यार्थी वाचस्पती कुलकर्णी, परभणी, श्रीवल्लभ गुरुप्रसाद पुजारी, नृसिंहवाडी, उत्कृष्ट शासकीय कर्मचारी डी. वाय. पाटील, खेबवडे आणि विशेष पुरस्काराने सौ. अनघा महेश कुलकर्णी, सांगली यांचा गौरव करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता पीठामध्ये पुरस्कार वितरण होईल.