no images were found
दूरशिक्षण केंद्राची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिया सुरु
कोल्हापूर(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची शैक्षणिक वर्ष २०२४-२५ ची एम.ए.(मराठी,हिंदी,इंग्रजी,समाजशास्त्र,राज्यशास्त्र, अर्थशास्त्र व इतिहास), एम.कॉम, एम.एस्सी (गणित) आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२४ पर्यंत असल्याची माहिती संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी दिली.
डॉ.मोरे म्हणाले की, जे विद्यार्थी अजूनही शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांचे शिक्षण अपूर्ण आहे, तसेच शासकीय व निम्न शासकीय अथवा खाजगी कर्मचारी,सेवक अशा इच्छुकांनी दूरशिक्षण आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राच्या एकूण ८६ अभ्यासकेंद्रात प्रवेशाची संधी मिळणार आहे.त्यामुळे विद्यार्थी, गृहिणी, कामगार,सैनिक,उद्योजक,शेतकरी, सरकारी कर्मचारी,खाजगी कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आदीनी आपला प्रवेश निश्चित करावा.
शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर Distance Education लिंकवर प्रवेशाबाबतची जाहिरात उपलब्ध असून http://sukapps.unishivaji.ac.in/studentregistration/#/login या ऑनलाईन लिंकवर आपला प्रवेश आजच निश्चित करावा. जे विद्यार्थी नियमित महाविद्यालयात प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना दुहेरी पदवीचा ही लाभ मिळणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्रातील विविध अभ्यासक्रमाना प्रवेशित व्हावे. अधिक माहितीसाठी शिवाजी विद्यापीठातील मुख्य कार्यालयाशी अथवा नजीकच्या महाविद्यालयातील अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा,असे
आवाहन संचालक प्रा.डॉ.डी.के.मोरे यांनी केले आहे.
वैशिष्ट्ये :
= दुहेरी पदवीची सोय, १२ प्रोग्राम अंतर्गत विविध कोर्सेस, दुर्गम भागासह ८६ अभ्यासकेंद्रांची सोय, विद्यार्थ्यांना NET / SET तसेच इतर स्पर्धा परीक्षाबाबत मार्गदर्शन, नोकरी विषयक आणि MPSC व UPSC मार्गदर्शन, शैक्षणिक आणि करियर विकासाच्या संधी, ४०० पेक्षा जास्त दर्जेदार स्वयं अध्ययन साहित्य, अभ्यास केंद्रामध्ये संपर्क सत्राचे आयोजन