no images were found
कोल्हापुरात एशिया इंडो शिखर परिषद सन्मान सोहळा संपन्न
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : – युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड, भारत व इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट व सहप्रायोजक न्यूज आखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने एशिया इंडो शिखर परिषद सन्मान सोहळा रविवार दि. 19 मे 2024, रोजी सकाळी 10.30 वाजता, शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन सर्वच पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात यशाच्या उत्तुंग आभाळात आणखी नवी क्षितिजे काबीज करून आपल्या क्षेत्रात अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा व उदंड शक्ती निर्माण करणाऱ्या सन्मानमूर्तींचा गौरव जेष्ठ अभिनेते टीव्ही कलाकार सुनील गोडबोले यांच्या शुभहस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेद फाउंडेशन इचलकरंजीच्या अध्यक्षा डॉक्टर रजनीताई शिंदे आणि न्यूज आखाडाचे जेष्ठ पत्रकार विनोद नाझरे, त्याचबरोबर कोल्हापूरचे पोलीस उपअधीक्षक माननीय सदानंद सदानशिवे आणि मुरबाड ,ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक श्री दिनेश उघडे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत समृद्धी प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, डॉ. बी. एन. खरात यांनी केले. सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले. विराज बांदेकर श्वेता शिर्के, कुसुम केतकर, डॉक्टर सुरेश राठोड यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.