no images were found
राजेश आणि कटोरी अम्मा यांच्यामध्ये सुरू झाला संघर्ष!
एण्ड टीव्हीवरील घरेलू कॉमेडी ‘हप्पू की उलटन पलटन’मधील कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) आणि राजेश (गीतांजली मिश्रा) यांच्यामधील नेहमीच्या धमाल गमतीजमतींना विनोदी वळण मिळणार आहे, जेथे त्या कुटुंबातील सदस्यांना फायटिंग रिंगमध्ये लढण्यासाठी सामील करतात. ही लढत हप्पूला (योगेश त्रिपाठी) विलक्षण स्थितीमध्ये टाकणार आहे.
आगामी एपिसोडबाबत सांगताना योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”राजेश आळस आल्यामुळे सकाळी हप्पूला चहा करण्यास सांगते. अम्माची बडबड टाळण्यासाठी ती हप्पूला गुपचूप चहा बनून आणण्यास सांगते. हप्पू राजेशच्या रूपात वेषांतर करण्यासाठी तिचा नाइट ड्रेस परिधान करतो. पण, कटोरी अम्मा त्याला पकडते आणि ती स्वत: राजेशला चहा देते. अर्ध झोपेत असलेली राजेश कटोरी अम्मासोबत भांडण करते. या भांडणासह दोघीही एकमेकींना आपापल्या कुटुंबांतील सदस्यांच्या शारीरिक ताकदीबाबत आव्हान करतात. रागाच्या भरात कटोरी अम्मा राजेशचे वडिल गब्बर (साहेब दास मानिकपुरी) आणि तिचे स्वत:चे वडिल टिंकू (नेहपाल गौतम) यांच्यामध्ये लढतीची घोषणा करते. गब्बर त्याची ताकद व फायटिंग क्षमता दाखवतो, ज्यामुळे राजेशचा आत्मविश्वास वाढतो. पण टिंकूची खरी क्षमता पाहिल्यानंतर ती स्पर्धेतून माघार घेण्याची विनंती करते.” गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”राजेश हप्पूची येण्याची आणि स्पर्धा थांबवण्याची वाट पाहत असते, पण हप्पू पोलिस स्टेशनमध्ये झोपला असल्यामुळे तेथे येऊ शकत नाही. तसेच पोलिस स्टेशनमध्ये ज्ञान चक्षू (प्रणय दिक्षित) त्याचा मालक संजू बावरा विरोधात (सौरभ चक्रवर्ती) तक्रार दाखल करतो की, त्याच्या गायनामुळे त्याला झोप येते. कमिशनर (किशोर भानुशाली) या केसचे निराकरण करण्याची जबाबदारी हप्पूवर सोपवतो. हप्पू संजूला अटक करतो. पण, हप्पू आणि मनोहर देखील संजूच्या अंगाई गीतामुळे झोपून जातात.” प्रेक्षकांना या आठवड्यामध्ये हास्यपूर्ण मनोरंजनाचा आनंद मिळणार आहे, जेथे हप्पू राजेशचे वडिल गब्बरला टिंकूकडून हार पत्करण्यापासून वाचवू शकेल का, हे पाहणे रोचक असणार आहे.