Home शैक्षणिक डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थ्यांचा कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प बनविण्यात यश

डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थ्यांचा कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प बनविण्यात यश

6 second read
0
0
28

no images were found

डीकेटीईच्या कॉम्प्युटर सायन्स मधील विद्यार्थ्यांचा कचरा विलगीकरण व्यवस्थापन प्रकल्प बनविण्यात यश

इचलकरंजी (प्रतिनिधी)- डीकेटीईमधील कॉम्प्युटर सायन्स चे विद्यार्थी सादिया गोरवाडे, प्रेषीता कांबळे, शिवानी कांबळे, कुणाल जाधव, अभिनंदन मिंडगे, ओंकार चौगले यांनी प्रा.वाय.एम. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ओला व सुका कचरा विलगीकरण व्यवस्थापन हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रकल्प विकसीत केलेला आहे. इन्स्टिटयूटमध्ये अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी आपला अंतिम वर्षातील प्रोजेक्ट निवडताना प्राधान्याने लोकांच्या दैनंदीन जीवनात येणा-या अडचणी समजावून घेवून त्यावर तंत्रज्ञानाच्या सहायाने समाधानकारक उपाययोजना तयार करण्यास प्रयत्न केला जातो.
 कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांनी डीकेटीईच्या आयडिया लॅबमध्ये संगणक कार्यप्रणालीचा वापर करून सुका व ओला कचरा विलगीकरण व्यवस्थापनाचा प्रकल्प तयार केला असून यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. ब-याचदा कचराकुंडयामध्ये सुका आणि ओला कचरा एकत्र टाकला जातो आणि यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरते यामुळे मानवी जीवनास हनिकारक असे साथीचे आजार पसरतात या समस्येचा विचार करुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आयओटी हे अधुनिक तंत्रज्ञान वापरुन कचरा व्यवस्थापन करणारा प्रकल्प तयार केला आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्टये म्हणजे मानवविरहीत स्वयंचलित ओला आणि सुका कच-याचे वर्गीकरण केले जाते या प्रकल्पामध्ये आयओटी आधारित मॉईश्‍चर सेन्सर वापरण्यात आले असून, आयआर सेन्सर हा डस्टबीन मधील कच-याची पातळी ओळखून मायक्रोकंन्ट्रोलरद्वारे इंटेल गॅलिलीओ या आयओटी डिव्हाईसला सिग्नल पाठवते यामुळे कचराकुंडया ओसंडून वाहणार नाहीत व अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरणार नाही व नागरिकांचे अरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पामुळे सुका व ओला कच-याचे वर्गीकरण आणि विलगीकरण करता येत असल्यामुळे त्याचा पुर्नवापर करणे आणि पुढे जाउन खत निर्मिती करता येणार आहे.
या प्रकल्पाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना सदर प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी प्रभारी संचालिका डॉ. सौ.एल.एस.आडमुठे, डे. डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. डी.व्ही. कोदवडे व पी.एम. गवळी यांचे विषेश सहकार्य लाभले.
फोटो ओळी – डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी सुका व ओला कचरा विलगीकरण व्यवस्थापनाचा तयार केलेल्या प्रकल्पासोबत मागदर्शक व विद्यार्थी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला

“वंदन हो” हे संगीत मानापमान चित्रपटातील मनाला तृप्त करणारं गाणं अखेर प्रे…