Home स्पोर्ट्स कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात

कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात

3 second read
0
0
107

no images were found

कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा कोल्हापूरात

कोल्हापूर (प्रतिनिधी) :- चेस असोसिएशन कोल्हापूरच्या वतीने रविवार दिनांक 19 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्हा महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
भीमा हेल्थ झोन,शाहू जलतरण तलाव,माळी कॉलनी,टाकळा,कोल्हापूर येथे या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने आंतरराष्ट्रीय जलद बुद्धिबळाच्या नियमानुसार होणार आहेत.रविवारी सकाळी दहा वाजता या स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर स्पर्धेच्या पहिल्या फेरीस प्रारंभ होईल. या स्पर्धेमध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बुद्धिबळपटूना भाग घेता येईल.
या निवड स्पर्धेतून चार महिलांची निवड 29 ते 31 मे 2024 दरम्यान पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य महिला संघ निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे़.
विजेत्या पहिल्या चार क्रमांकांना अनुक्रमे रु.500/-, रु.400/- , रु.300/- व रु.200/- रु.रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
त्याशिवाय निवड झालेल्या बुद्धिबळपटूंना राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा खेळून आल्यावर प्रत्येकी एक हजार रुपये व स्पर्धेत खेळण्यासाठी प्रत्येकास टी शर्टस् संघटनेच्या वतीने देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त रुपये 200 प्रवेश शुल्क ठेवले आहे. तरी इच्छुक बुद्धिबळपटूनी शनिवार दिनांक 18 मे ला रात्री आठ वाजेपर्यंत प्रवेश फी सह आपली नावे खालील व्यक्तीकडे नोंदवावीत.

1) श्री. भरत चौगुले – 7620067251. 2) श्री.मनीष मारुलकर – 9922965173. 3) श्री.उत्कर्ष लोमटे – 9923058149. 4) श्री.प्रितम घोडके – 8208650388. 5) श्री.रोहित पोळ – 9657333926

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In स्पोर्ट्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी निकम

“रोटरी हेरिटेजचे समाजाभिमुख कार्य प्रेरणादायी व आदर्शवत” – महापौर सौ रूपाराणी न…