Home सामाजिक ईपॅक ड्युरेबल लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

ईपॅक ड्युरेबल लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

16 second read
0
0
20

no images were found

ईपॅक ड्युरेबल लिमिटेडने सेबीकडे डीआरएचपी सादर केले

ईपॅक ड्युरेबल लिमिटेडने (“कंपनी”) मार्केट नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे डीआरएचपी सादर केले आहे. एफअँडएस रिपोर्टनुसार, २०२० आणि २०२३ या आर्थिक वर्षांदरम्यान भारतात उत्पादन व्हॉल्युममध्ये झालेल्या वाढीच्या आधारे, ही कंपनी सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेली रूम एअर कंडिशनर ओरिजिनल डिझाईन मॅन्युफॅक्चरर आहे.

प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी समभागांच्या आयपीओमार्फत भांडवल उभारणी करण्याची कंपनीची योजना आहे. या ऑफरमध्ये ४०० कोटी रुपयांपर्यंतच्या नव्याने जारी करण्यात येत असलेल्या इक्विटी शेयर्सचा आणि समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत असलेल्या समभागधारकांकडून १,३०,६७,८९० पर्यंत इक्विटी शेयर्सचा समावेश आहे.

नव्याने जारी करण्यात येणाऱ्या समभागांमधून उभारली जाणारी रक्कम पुढील कारणांसाठी वापरण्याची कंपनीची योजना आहे – १.  उत्पादन सुविधांचा विस्तार / उभारणी यासाठी भांडवली खर्च करण्यासाठी; २. कंपनीच्या काही कर्जांची अंशतः किंवा संपूर्ण परतफेड; आणि ३. सर्वसाधारण कॉर्पोरेट कामे

समभाग विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये – बजरंग बोथरा यांच्याकडून ११,७२,९७६ पर्यंत, लक्ष्मी पत बोथरा यांच्याकडून ६,६६,७९८ पर्यंत, संजय सिंघानिया यांच्याकडून ७,४८,७२१ पर्यंत, अजय डीडी सिंघानिया यांच्याकडून ७,४८,७२१ पर्यंत, (“समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करत असलेले प्रमोटर”), पिंकी अजय सिंघानिया यांच्याकडून २,८६,३५१ पर्यंत, प्रीती सिंघानिया यांच्याकडून २,८६,३५१ पर्यंत, निखिल बोथरा यांच्याकडून ४,४२,९०५ पर्यंत, नितीन बोथरा यांच्याकडून ४,४२,९०५ पर्यंत, रजत कुमार बोथरा यांच्याकडून ३,७९,६३३ पर्यंत (“समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करणारा प्रमोटर समूह”), इंडिया अड्वन्टेज फंड एस४ I कडून ७२,६१,१२७ पर्यंत, डायनामिक इंडिया फंड एस४ यूएस I यांच्याकडून ६,३१,४०२ पर्यंत (“समभाग विक्रीसाठी प्रस्तुत करणारे गुंतवणूकदार”) इक्विटी समभागांचा समावेश आहे.

हे इक्विटी समभाग रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत केले जात असून बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स ऍक्सिस कॅपिटल लिमिटेड, डीएएम कॅपिटल अड्वायजर्स लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…