no images were found
भाजप बहुमताचा दुरुपयोग करत नाही, ; अमित शाहा
मुंबई : संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे 10 वर्षापासून बहुमत आहे पण आम्ही तसा प्रयत्न कधी केला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सोबतच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. केजरीवालांच्या अंतरिम जामिनाला काही जण विजय समजत आहेत. पण केजरीवाल जिथे जातील तिथे लोकांना मद्य घोटाळा आठवेल, अशी टीका शाहांनी केली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. केवळ राजकीय स्थैर्यासाठीच 400 जागा हव्यात, असेही ते म्हणाले.
अमित शाह म्हणाले, आमच्याकडे 10 वर्षापासून बहुमत, संविधान बदलण्यचा प्रयत्न आम्ही कधी केला नाही. बहुमताच्या दुरुपयोगाचा इतिहास माझ्या पक्षाचा नाही, प्रचंड बहुमताने मोदी पुन्हा सत्तेत येतील. देशाच्या सुरक्षेसाठी आम्हाला 400 जागा हव्या आहेत. बहुमताचा दुरुपयोग काँग्रेसने केला आहे. इंदिरा गांधीच्या काळात काँग्रेसने सत्तेचा दुरुपयोग केला आहे.
B. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मी काही बोलणार नाही. पण काही जण केजरीवालांच्या अंतरिम जामीनाला केजरीवालांचा विजय समजत आहेत, केजरीवाल जिथे जातील तिथे लोकांना मद्य घोटाळा आठवेल. काही लोकांना मोठ्या मोठ्या बाटल्या दिसतील, असे देखील अमित शाह म्हणाले.
बहुमत मिळाले नाही तर भाजपचा प्लान बी काय आहे यावर अमित शाह म्हणाले, प्लान बी पर्यंत जाण्याची गरज मला वाटत नाही. प्लान बी चा विचार तेव्हाच केला जातो ज्यावेळी 60 टक्क्यापेक्षा कमी यश मिळण्याची शक्यता असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बहुमताने विजयी होतील आम्हाला विश्वास आहे.