
no images were found
उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्यासाठी कलाकारांच्या पसंतीचे रिफ्रेशिंग खाद्यपदार्थ!
भारतात उन्हाळ्यामधील उकाडा वाढत असताना स्वादिष्ट ट्रीट्स अपरिहार्य बनले आहेत, जे कडाक्याच्या ऊनापासून रिफ्रेशिंग अनुभव देऊ शकतात. यादरम्यान सर्वत्र थंडगार मिष्टान्नांचे सेवन केले जाते, जे उन्हाळ्यामध्ये उत्साहवर्धक आरामदायीपणा देऊ शकतात. एण्ड टीव्ही कलाकार त्यांच्या आवडत्या थंडगार हंगामी स्नॅक्सबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मालिका ‘अटल’मधील आशुतोष कुलकर्णी (क्रिष्णन बिहारी वाजपेयी), मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी (दरोगा हप्पू सिंग) आणि मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्व गौड (मनमोहन तिवारी). मालिका ‘अटल’मधील आशुतोष कुलकर्णी ऊर्फ क्रिष्णन बिहारी वाजपेयी म्हणाले, ”मी उन्हाळ्यामध्ये रसाळ आणि तोंडाला पाणी आणणारे आंबे खाण्यासोबत उत्साहवर्धक मलाईदार मँगो लस्सी पितो. आणि तहान भागवण्यासाठी मी ग्लासभर लिंवूपाणी पितो. आणि सुगंधित रोझ-फ्लेवर्ड बर्फाचा गोळा विसरून कसे चालणार, जो मला माझ्या बालपणीची आठवण करून देतो. विशेषत: कडाक्याच्या ऊनादरम्यान मला या स्वादिष्ट ट्रीट्समधून आनंद व आरामदायीपणा मिळतो. या थंडगार व रिफ्रेशिंग ट्रीट्सचा आस्वाद घ्यायला कोणाला आवडणार नाही?”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ दरोगा हप्पू सिंग म्हणाले, ”उन्हाळा आनंददायी असू शकतो. तसेच, उन्हाळा तापदायक असू शकतो हे देखील नाकारता येऊ शकत नाही. पण, उष्णतेवर मात करण्यासाठी माझ्याकडे काही कूल, अद्भुत फूड टिप्स आहेत. मला आमपन्ह, गोलगप्पे आणि उत्साहवर्धक थंडगार लस्सी सेवन करायला आवडते. याव्यतिरिक्त, मी हायड्रेटेड राहण्यासाठी रसाळ कलिंगड स्लाइसचा आणि फ्रेश ज्यूसेसचा आस्वाद घेतो. माझ्या मते, प्रत्येक सीझनमध्ये वातावरणाला अनुसरून विविध प्रकारच्या फूडचा आस्वाद घेण्याची संधी मिळते. सेलिब्रेशन्ससोबत फूडचा आस्वाद घेतला जातो, ज्यामधून आठवणी निर्माण होतात, ज्या दीर्घकाळापर्यंत स्मरणात राहतात. मी सर्वांना फूडचा आस्वाद घेण्यासोबत काही संस्मरणीय आठवणी तयार करण्याचे आवाहन करतो.” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील रोहिताश्व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्हणाले, ”तापमान वाढत असताना मी रिफ्रेशिंग फूड्स आणि पेयांना प्राधान्य देतो. मी रसाळ कलिंगड, थंडगार काकडी, कुल्फी, दहीभात आणि घरी बनवलेले पोटॅटो चाट यांचा आस्वाद घेतो. मी विशेषत: उन्हाळ्यादरम्यान पालक, राजगिराची पाने व पुदीना यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करण्याची शिफारस करतो. हे फूड्स शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास आणि हायड्रेटेड राहण्यास मदत करू शकतात. मला आजही उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान केली जाणारी धमाल आठवते, जसे पिकनिक, आइस्क्रीम, पूल पार्टी आणि इनडोअर गेम्स, जे कुटुंबांना एकत्र आणतात आणि उन्हाळ्याला आनंददायी व आनंददायी करतात.”