no images were found
डीकेटीईतील टेक्स्टाईलच्या पाच विद्यार्थ्यांची हिमतसिंगका या कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड
इचलकरंजी(प्रतिनिधी) ः डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजी मधील टेक्स्टाईलच्या पाच विद्यार्थ्यांची हिमतसिंगका या नामांकित कंपनीत उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. हिमतसिंगका कंपनीमध्ये डीकेटीईचे निवड झालेले विद्यार्थी विविध पदावर लवकरच रुजू होणार आहेत.
हिमतसिंगका ही वस्त्रोद्योगातील नामांकित कंपनी दरवर्षी डीकेटीईस भेट देते व विद्यार्थ्यांची निवड करते. याही वर्षी हिमतसिंगका कंपनीने रिटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्हयू अशा विविध फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक गुणवत्ता तपासली व ५ विद्यार्थ्यांची कंपनीच्या विविध विभागामध्ये निवड केली. अभिषेक शिंदे, अशुतोष पाटील, संजना पटेकरी, साक्षी नौगन व साक्षी रानडे हे निवड झालेले विद्यार्थी आहेत. हिमतसिंगका ही कंपनी होम टेक्स्टाईल, बेडिंग, बाथ प्रोडक्टस, टेरी टॉवेेल, आणि ड्रेपरी इत्यादी उत्पादनात अग्रेसर आहे.
डीकेटीई मधील तज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री यामुळे इथे शिक्षण घेणारा विद्यार्थी कुशल अभियंता बनत आहे. डीकेटीईचे उत्तमोत्तम विद्यार्थी आपल्या कंपनीमध्ये घेण्यासाठी कंपन्यामध्ये देखील चढाओढ सुरु आहे. म्हणूनच प्लेसमेंटमध्ये आघाडीवर असलेल्या या इन्स्टिटयूटमध्ये देश आणि विदेशातील नामांकीत कंपन्या कॅम्पसमधून विद्यार्थ्यांची निवड करतात. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे. शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात या दोन्ही क्षेत्रात डीकेटीई सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे, उपाध्यक्ष, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे प्र.संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील, टीपीओ प्रा.एस.बी.अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.