no images were found
“झांसी ते जान्वी, आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाले आहे.” सांगत आहे उल्का गुप्ता
अभिनेत्री उल्का गुप्ता ही 2009-2010 सालच्या झी टीव्हीवरील ‘झांसी की रानी’मध्ये छोट्या मणिकर्णिकेच्या भूमिकेसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा 15 वर्षांनंतर झी टीव्हीवरील नवीन मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’मधून जान्वीच्या भूमिकेत ती वाहिनीवर पुनरागमन करत आहे. झी टीव्हीवरील आगामी मालिका ‘मैं हूँ साथ तेरे’ ही प्रेक्षकांना जान्वी (उल्का गुप्ता) ह्या एका सिंगल आईच्या आयुष्यप्रवासावर घेऊन जाणार आहे, जिथे एक आई म्हणून आपली जबाबदारी निभावताना तिला वडिलांच्या जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. ह्या मालिकेत जान्वी आपला मुलगा किआन (निहान जैन) सोबत ग्वाल्हेर येथे राहते आणि तोच तिचे विश्व आहे. त्यांचे नाते अतिशय दृढ असले तरी घरामध्ये एका पुरूषाची कमी किआनला जाणवते, पण ते त्याच्या स्वतःसाठी नाही तर त्याच्या आईच्या दृष्टीने. जेव्हा जान्वीची ओळख एका समृद्ध व्यावसायिक आर्यमनसोबत होते तेव्हा ह्या कथेमध्ये आणखी रंगत येईल. ते दोघे एकाच छताखाली एकत्र काम करतात. पहा किआनला त्याच्या सिंगल आईला तिच्यावर प्रेम करणाऱ्या पुरूषाच्या जवळ आणण्यासाठी भूमिका बजावताना…
छोट्या धैर्यशाली स्वतंत्रता वीर मणिकर्णिकाची भूमिका उल्का वयाच्या 12 वर्षी साकारली होती आणि आता ह्या मालिकेत जान्वी ह्या सिंगल आईची भूमिका ती साकारत असून बराच मोठा पल्ला तिने गाठलेला आहे.
आपल्या पुनरागमनाबद्दल उत्साहात असलेली उल्का गुप्ता म्हणाली, “‘झांसी की रानी’ची भूमिका साकारल्यानंतर आता झी टीव्हीवर जान्वी साकारताना आयुष्याचे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. 15 वर्षांनंतर ह्या वाहिनीवर पुनरागमन करताना खूप छान वाटतंय. मी 12 वर्षांची असताना छोट्या मनुची भूमिका करतानाही मला खूप प्रेम मिळाले आणि आता जिथे मी माझ्या कारकिर्दीची सुरूवात त्याच वाहिनीवर जान्वी ह्या स्वतंत्र सिंगल आईची बळकट व्यक्तिरेखा साकारताना मला खूप आनंद होत आहे. हे म्हणजे अक्षरशः स्वगृही परतण्यासारखे आहे.” उल्का आपल्या नवीन भूमिकेसाठी उत्साहात असून तिच्यासोबत आर्यमन आणि किआन यांना पाहताना आणि ह्या मालिकेचा प्रेम, आयुष्य आणि नातेसंबंधांवरील निरागस दृष्टीकोन अनुभवणे प्रेक्षकांसाठी रोचक ठरेल.