no images were found
अंगूरी आणि अनिताला झाली अटक!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है‘ अनपेक्षित व हसवून-हसवून लोटपोट करणाऱ्या कथानकांसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ही मालिका दर आठवड्याला लक्षवेधक व मनोरंजनपूर्ण कथा सादरकरते, ज्यामुळे प्रेक्षक पुढील एपिसोडची आतुरतेने वाट पाहतात. कथानकामधील पुढील ट्विस्टमध्ये लाडक्या भाबी अंगूरी (शुभांगी अत्रे) आणि अनिता (विदिशा श्रीवास्तव) यांना अटक होताना पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षक त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रिनसमोर गुंतून राहतील. भाबी अनपेक्षित अडथळ्यांचा सामना करतात, ज्यामध्ये विनोदी क्षण पाहायला मिळतील. आगामी एपिसोडबाबत सांगताना विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबीम्हणाल्या, ”अनिता व अंगूरी (शुभांगी अत्रे) अनेकदा विविध कारणांसाठी त्यांच्या पतीसोबत भांडण करतात. अनोखे लाल सक्सेना (सानंद वर्मा) त्यांच्या या वागणूकीचे निरीक्षण करतो आणि त्यांच्यामधील सततच्या भांडणांमुळे त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा येण्याचा सल्ला देतो. तो आपला मुद्दा पटवून देण्यासाठी जर्मन मॅरेज तज्ञाचे उदाहरण देतो. आपल्या नात्याबाबत चिंतित दोन्ही भाबी शांत राहण्याचा आणि आपल्या पतीवर न रागावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यामध्ये झालेल्या अचानक बदलामुळे विभुती (आसिफ शेख) व तिवारी (रोहिताश्व गौड) आश्चर्यचकित होतात. त्यांच्या मनात संशय निर्माण होऊ लागतो की, त्यांच्या पत्नींचे त्यांच्यावरील प्रेम कमी झाले आहे. दरम्यान, प्रेम (विश्वनाथ सोनी) त्याचा मित्र ग्रोव्हरची कथा सांगतो, ज्याने अशाच स्थितीचा सामना केला आणि त्यानंतर त्याला समजले की त्याच्या पत्नी विवाहबाह्य संबंध आहे. हे ऐकताच तिवारी व विभुती चिंतित होतात, ज्यामुळे प्रत्येक प्रयत्नामध्ये त्यांच्या पत्नीवर नाराज होतात आणि त्यांना त्रास देऊ लागतात.” शुभांगी अत्रेऊर्फ अंगूरी भाबीम्हणाल्या, ”दोन्ही भाबी अंगूरी व अनिता आपल्या पतींच्या गैरवर्तनाप्रती त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवतात. पण त्यांचे नैराश्य शेवटी टोकावर पोहोचते, जेथे ते रागाच्या भरात दरोगा हप्पू सिंगला (योगेश त्रिपाठी) कानाखाली मारतात. दुर्दैवाने, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यामुळे कमिशनर (किशोर भानुशाली) पोलिस अधिकारीला मारहाण करण्यासाठी अंगूरी व अनिताविरोधात अटक वॉरंट जारी करतो. यामुळे सर्वांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते आणि ते अंगूरी आणि अनिताची सुटका करण्यासाठी योजना आखू लागतात, जेथे विनोदी नाट्यमय स्थिती निर्माण होते.”
मालिका ‘भाबीजी घर पर हे‘चा आणखी एक विनोदी एपिसोड सादर केला जाणार असताना प्रेक्षक अंगूरी व अनिता अटक होण्याला कशाप्रकारे टाळतील हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा एपिसोड हास्य व सरप्राइजनी भरलेला असणार आहे. विभुती आणि तिवारी त्यांना पोलिसांपासून वाचवण्यामध्ये यशस्वी होतील का?