no images were found
डीकेटीईचा बांग्लादेशमधील सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी यांच्यात सामंजस्य करार
इचलकरंजी (प्रतिनिधी): डीकेटीईचा बांग्लादेश मधील सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी यांच्याशी सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे डीकेटीई इन्स्टिटयूट व सीबीयुएफटी विद्यापीठांशी शिक्षण आणि संशोधन याबाबत आदानप्रदान करण्यात आले. संशोधनातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लावणे हा दृष्टीकोन डोळयासमोर ठेवून यापूर्वी डीकेटीईने २८ नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार केलेले आहेत. त्यातूनच डीकेटीईने सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी, बांग्लादेश यांच्यात सामंजस्य करार झाला.
बांग्लादेशमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्रीज खूप मोठया प्रमाणावर कार्यरत आहेत. जागतिक पातळीवर वस्त्रोद्योग केंद्र म्हणून बांग्लादेश उदयास येत आहे. त्यामुळे बांग्लादेश मधून शैक्षणिक, औद्योगिक, प्लेसमेंटस, ऍडमिशन या संबंधीत वरचेवर सेवा देण्यासाठी यापूर्वी डीकेटीईला निमंत्रित केले गेले होते डीकेटीईचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक कार्याचा आढावा घेतल्यानंतर सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजीचे व्हॉईस चान्सलर यांनी डीकेटीई समोर कराराचा प्रस्ताव मांडला. त्यासअनुसरुन सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी बांग्लादेश मधील डायरेक्टर आयक्युएसी, प्रा. काझी नझमुल हुडा, डीन- मुशुहर रेहमान व प्रा. इमान बिस्वास यांनी डीकेटीईस भेट दिली व डीकेटीई आणि सीबीयुएफटी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. या भेटीवेळी डीकेटीईमध्ये उपलब्ध असलेले विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण यायुळे ते प्रभावी झाले तसेच डीकेटीईचे इंडस्ट्रीसोबत असलेले इंटरऍक्शन, इंडस्ट्रीना देण्यात येणारे अद्ययावत प्रशिक्षण याचा विचार करुन बांग्लादेशमधील वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी करार केला.
या करारामध्ये सेमिस्टर एक्स्चेंज अंतर्गत सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी बांग्लादेशचे विद्यार्थी २०२४ पासून डीकेटीई येथे प्रवेश घेणार असून तेथील क्रेडीट विद्यार्थ्यांच्या येथील मार्कशीटमध्ये समाविष्ट करण्यात येतील. सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठमधील प्राध्यापक देखील डीकेटीईस भेट देतील. तसेच बी.टेक. पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना डीकेटीई येथे एम.टेक. करण्यासाठी प्राधान्य मिळेल. याव्यतिरीक्त संयुक्तपणे पेटंट, संयुक्तपणे कार्यशाळा इंडस्ट्रीयल संशोधन, संयुक्त सेमिनार्स अशा विविध मुद्यांचा या करारामध्ये समावेश आहे.
यावेळी सीबीयुएफटी युनिर्व्हसिटी फॅशन ऍण्ड टेक्नॉलॉजी शिष्टमंडळाने डीकेटीई सीओई नॉनओव्हन्सला भेट दिली, इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर व विविध इंडस्ट्रीना भेटी दिल्या. या सामंजस्य करारावेळी डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे, ट्रस्टी रवी आवाडे, प्र. संचालिका प्रा. डॉ एल.एस. आडमुठे, डॉ एम वाय गुडियावर व इतर प्राध्यापक उपस्थित होते. डॉ एस.एस. लवटे यांनी डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर करार यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
फोटो ओळी- डीकेटीईचा बांग्लादेशातील सीबीयुएफटी यांच्यासोबत करारावेळी डीकेटीईच्या सचिव डॉ सपना आवाडे, प्र. संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, प्रा. काझी नझमुल हुडा, डीन- मुशुहर रेहमान व इतर.