
no images were found
–47 कोल्हापूर मतदारसंघातील नमुना 12 भरलेल्या व अद्याप टपाली मतदान न केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुविधा केंद्रावर मतदान करा – अमोल येडगे
कोल्हापूर: ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नमुना १२ भरुन दिलेला आहे व ज्यांनी अद्याप टपाली मतदान केलेले नाही अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी Facilitation Center (सुविधा केंद्र) ठिकाणी येऊन मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ४७ कोल्हापूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने निवडणूक कर्तव्यावर असणारे अधिकारी, कर्मचारी (पोलीस, होमगार्ड व इतर सर्व) यांचे टपाली मतपत्रिकेव्दारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना मतदान करण्यासाठी दि. २ ते ६ मे २०२४ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी शाखा कार्यालयात सकाळी कार्यालयीन वेळेत सोय करण्यात आली आहे. या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी Facilitation Center (सुविधा केंद्र) स्थापन करण्यात येणार आहे.