no images were found
मालिका ‘अटल’ने साजरा केला १०० एपिसोड्सचा टप्पा!
एण्ड टीव्हीवरील मालिका ‘अटल’साठी सेलिब्रेशनची वेळ आहे, जेथे मालिकेने १०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण केला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेचे कथानक भारतातील ब्रिटीश वसाहतवाद राजवटीवर आधारित आहे, ज्यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील सुरूवातीच्या काळाला दाखवण्यात आले आहे. या यशस्वी टप्प्याला साजरे करण्यासाठी मालिकेचे प्रतिभावान कलाकार जसे नेहा जोशी (कृष्णा देवी वाजपेयी), व्योम ठक्क्र (यंग अटल), आशुतोष कुलकर्णी (क्रिष्णन बिहारी वाजपेयी), मिलिंद दस्ताने (श्यामलाल वाजपेयी), प्रचिती अहिरराव (विमला) हे या आनंदमय प्रसंगाला साजरे करण्यासाठी एकत्र आले, तसेच त्यांनी १०० एपिसोड्सदरम्यानच्या त्यांच्या उल्लेखनीय प्रवासाबाबत देखील सांगितले. १०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण झाल्याबाबत आपला आनंद व्यक्त करत कृष्णा देवी वाजपेयीची भूमिका साकारणाऱ्या नेहा जोशी म्हणाल्या,“१०० एपिसोड्सचा टप्पा पूर्ण करणे आमच्यासाठी मोठा क्षण आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला आहे. प्रथम, आम्ही मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करण्यााठी आमच्या प्रेक्षकांचे आभार मानतो. तसेच या मालिकेला यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेणारे माझे सह-कलाकार व समर्पित टीमचे देखील आभार, ज्यांच्या समन्वय व अथक मेहनतीमुळे हे यश शक्य झाले आहे. या प्रवासाने मला अभिनेत्री म्हणून विविध भावनांचा अनुभव घेण्याच्या संधी दिल्या आहेत आणि या टप्प्यापर्यंत पोहोचल्यानंतर माझे मन अभिमानाने भरून आले. प्रेक्षकांनी आमच्या मालिकेवर केलेला प्रेमाचा वर्षाव हृदयस्पर्शी आहे आणि त्यामधून आम्हाला अधिक उत्तम कामगिरी करण्यास प्रेरणा मिळते. नुकतेच, आमच्या मालिकेच्या यशासाठी आशीर्वाद घेण्याकरिता आणि रामनवमी साजरी करण्याकरिता अयोध्यामधील राममंदिराला भेट दिली असताना आम्ही आमच्या चाहत्यांचे उत्स्फूर्त प्रेम पाहून भारावून गेलो. त्यांनी मालिका व मालिकेमधील पात्रांचे भरभरून कौतुक केले. आम्ही सेटवर मालिका ‘अटल’च्या टीमसोबत या क्षणाला साजरे केले, आमच्या प्रवासाला आकार दिलेल्या आठवणींना उजाळा देखील दिला.” यंग अटलची भूमिका साकारणारा व्योम ठक्कर म्हणाला, “आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत खास क्षण आहे. मला आनंद होत आहे की, आम्ही १०० एपिसोड्स पूर्ण केले आहेत. आतापर्यंतचा प्रवास अद्भुत राहिला आहे आणि आम्ही दुसरे कुटुंब बनलो आहोत. या अविश्वसनीय यशासाठी सर्वांचे अभिनंदन!” क्रिष्णन बिहारी वाजपेयीची भूमिका साकारणारे आशुतोष कुलकर्णी म्हणाले, “मालिका ‘अटल’सोबतचा माझा प्रवास अविश्वसनीय राहिला आहे. प्रेक्षकांनी माझ्या भूमिकेच्या केलेल्या कौतुकामुळे मला खूप आनंद झाला आहे. मला सतत आमची मालिका व पात्रांचे कौतुक करणारे संदेश मिळतात. आमच्या समर्पित टीमच्या सहयोगात्मक प्रयत्नामुळे मालिका यशस्वी ठरली आहे आणि १०० एपिसोड्सचा टप्पा आमच्यासाठी मोठा क्षण आहे. सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आम्ही केक कापत हा खास क्षण उत्साहात साजरा केला. असे पुढे अनेक उत्साहवर्धक टप्पे येवोत, अशी आशा व्यक्त करतो.”