
no images were found
पृथ्वी दिनानिमित्त ‘वनअर्थ फाऊंडेशन’चा स्तुत्य उपक्रम
गोवा, : पृथ्वी दिनाचे स्मरण करण्यासाठी आणि स्वच्छ पर्यावरण उपक्रमात योगदान देण्यासाठी ‘वनअर्थ फाऊंडेशन’तर्फे जुन्या गोव्याजवळील एका झोपडपट्टीतील वंचित शाळेत स्टडी टेबल्स आणि बेंच दान करण्यात येत आहेत. फाऊंडेशनच्या ३० दिवसांच्या प्लॅस्टिक प्रदूषणाविरुद्ध मोहिमेदरम्यान (डीएपीपी) गोळा केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून हे स्टडी टेबल्स आणि बेंच निर्मित करण्यात आले आहेत. प्लॅस्टिक प्रदूषणाचा सामना करणे आणि शाश्वत पद्धतींना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या मोहिमेत १३०० हून अधिक व्यक्ती आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. यात गोव्याच्या १२० किलोमीटरच्या किनारपट्टी भागात राबवलेल्या ५९ कार्यशाळा आणि स्वच्छता मोहिमेतून १.४ टन कचरा गोळा करण्यात आला. हा उपक्रम प्रतिकात्मक असण्याबरोबरच वनअर्थ फाऊंडेशनच्या गोलाकार अर्थव्यवस्थेच्या पद्धतींमध्ये रुजलेल्या मूलभूत तत्त्वांना मूर्त रूप देतो.
कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करून अधिक पर्यावरण जागरूक समाजासाठी योगदान देऊन त्यातील पळवाटा बंद करण्यावर फाऊंडेशनला विश्वास आहे. तसेच मर्यादित संसाधने आणि संधी असलेल्या सरकारी, दिव्यांग शाळा आणि वंचित संस्थांकडे फाऊंडेशनने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या समुदायांना पर्यावरण संवर्धनासाठी ज्ञान आणि साधनांसह सक्षम करण्यासह हवामान शिक्षण कार्यशाळा आणि कार्यक्रम घेण्याचे फाऊंडेशनचे उद्दिष्ट आहे.
वनअर्थ फाउंडेशनचे संस्थापक फर्डिन सिल्वेस्टर म्हणाले, की आम्ही जागरूक समुदाय आणि सर्वंकष प्रणालीच्या सामर्थ्यावर खूप विश्वास ठेवतो, जे आमच्या प्रत्येक कृतीतून स्पष्ट होते. तरुण मुलांना कचऱ्यापासून बनवलेल्या बेंचचे वाटप केल्याने आम्हाला आमच्या योगदानाचा अभिमान वाटतो, अन्यथा हा कचरा जमिनीत किंवा महासागरांमध्ये गेला असता. कचऱ्याचा जीवनावर होणारा परिणाम तरुणांनी समजून घेतला आणि आता प्रथम डस्टबिन नसण्यापासून ते शाळेतील कचरा वेगळा करण्यापर्यंतचे स्थित्यंतरही त्यांनी समजून घेतले आहेत.आमच्या संस्थेने हे सकारात्मक बदल घडवून आणल्याचे खूप समाधान वाटते. आता याहूनही पुढे जात आम्ही लक्ष केंद्रित केलेल्या क्षेत्रात पुनर्वापराच्या माध्यमातून सर्क्युलर मॉडेल लागू करणे, हवामानाच्या स्थितीबद्दल तरुणांना शिक्षित करणे, खारफुटीच्या पुनर्संचयनास प्रोत्साहन देणे आणि मच्छीमारांसह किनारपट्टीवरील समुदायांना सोबत घेऊन इतर प्लास्टिक कचरा नष्ट करणे आदी बाबी पूर्णपणे समाविष्ट करण्यात आल्या आहेत’.
वनअर्थ फाउंडेशन हवामान बदलाची क्रिया आणि किनारी भागातील इकोसिस्टम जतन करण्यासाठी खूप वचनबद्ध आहे. नवकल्पना, समुदाय उभारणी आणि परिवर्तनकारी बदल घडवून आणणाऱ्या स्थानिक आणि जागतिक सहकार्याच्या माध्यमातून शाश्वत कचरा व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करण्याचा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे.अशा जगाची कल्पना करा जिथे आपण निसर्गाशी एकोप्याने राहतो. हे असे जग जिथे आपला ग्रह सर्वांसाठी स्वच्छ आणि निरोगी आहे. असेच सुंदर जग निर्मित करण्याचे काम वनअर्थ फाऊंडेशन करत आहे. आणि यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. प्रत्येक लहान कृती बदल घडवते. जेव्हा प्रत्येकजण एकत्र येऊन काम करतो, त्यातून आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक शाश्वत भविष्य निर्माण होऊ शकते.