Home सामाजिक सनफिस्ट तर्फे ‘किंग ऑफ फॅन्टसी’ शाहरुख खान, डार्क फॅन्टसीचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित

सनफिस्ट तर्फे ‘किंग ऑफ फॅन्टसी’ शाहरुख खान, डार्क फॅन्टसीचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित

10 second read
0
0
101

no images were found

सनफिस्ट तर्फे ‘किंग ऑफ फॅन्टसी‘ शाहरुख खान, डार्क फॅन्टसीचा नवा ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित

 

आयटीसी  च्या सनफिस्ट डार्क फॅन्टसीतर्फे नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून ‘किंग ऑफ फॅन्टसी’ असलेल्या शाहरुख खानची नियुक्ती करण्यात आली असून या नवीन प्रवासाची सुरुवात करण्यास ते अत्यंत उत्साहात आहेत.

आपल्या ग्राहकांशी नाळ जोडण्याच्या उद्दिष्टाने सनफिस्ट डार्क फॅन्टसीतर्फे ‘सनफिस्ट डार्क फॅन्टसी – प्रत्येक मनाची फॅन्टसी’ हे नवे ब्रँड विधान सादर करण्यात आले आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याला कल्पनाविश्वाचा स्पर्श देण्याच्या सर्वांमध्ये आढळणाऱ्या भावनेतून ही अभिनव संकल्पना आकारास आली आहे. या नव्या दृष्टिकोनातून ब्रँडला विविध प्रकारच्या ग्राहकगटाशी नाते जोडायचे आहे. यासाठी कोणत्याही वेळी कल्पनाविश्वात रममाण होण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचे आहे. लाखो चाहत्यांचे प्रेम लाभलेला शाहरुख खान प्रत्येक भारतीयाच्या फॅन्टसीचे प्रतिनिधित्व करतो. या दोहोंमधील सहयोगिता हे एक उत्तम कॉम्बिनेशन आहे.

या उत्कंठा वाढविणाऱ्या वातावरणात ब्रँडने शाहरुख खान असलेला भुरळ पाडणारा टीझर सादर केला आहे. हा टीझर हिंदी, तमिळ आणि इतर अनेक भाषांमध्ये इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सादर करण्यात आला आहे. या धोरणात्मक पावलामुळे लोकांचे याकडे लक्ष गेले आहे आणि याबद्दल सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. या टीझरला सोशल मीडिया चॅनल्सवर भरघोस प्रतिसाद लाभला आहे आणि चाहत्यांनी विविध प्लॅटफॉर्म्सवर हा कंटेन्ट शेअर केल्यामुळे या प्रतिसादात वाढच होत आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार

कोल्हापुरात ‘रेड मड 4X4 ऑफ-रोड चॅलेंज’चे आयोजन; रविवारी वेसरफमध्ये थरार कोल्हा…