12 second read
0
0
38

no images were found

२५,२६ एप्रिल रोजी पाणीपुरवठा राहणार बंद             कोल्हापूर : पुईखडी जलशुध्दीकरण केंद्राकडून येणा-या 1100 मी.मी. व्यासाच्या पाईपलाईनला आय.टी.आय.वस्तीगृह नजीक असणा-या क्रॉस कनेक्शनच्या दुरूस्तीचे काम गुरूवार, दि. 25  एप्रिल 2024 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा गुरूवार व शुक्रवार, दि. 25 व 26 एप्रिल 2024 रोजी होऊ शकणार नाही. तसेच शनिवार, दि.27 एप्रिल 2024 रोजी होणारा दैनंदिन पाणी पुरवठा अपुरा व कमी दाबाने होईल.

         यामध्ये ए, बी, वॉर्ड मधील पुईखडी जल शुद्धीकरण केंद्रावरून शहरांतर्गत येणा-या कळंबा जेल समोरील डॅश ग्रुप, वसंत विश्वास पार्क, एल.आय.सी. कॉलनी, अमरनाथ मंदिर परिसर, बाबुराव साळोखे पार्क, तपोवान, म्हाडा कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स परिसर, नाळे कॉलनी, बापुराम नगर, प्रथमेश नगर, महाराष्ट्र नगर, सुर्वे नगर, बुध्दी होळकर नगर, वाल्मिकी आंबेडकर नगर, हस्तीनापुर नगरी, शांती उद्यान परिसर, शिवगंगा कॉलनी, श्रीराम कॉलनी, साई कॉलनी, साळोखेनगर संपूर्ण परिसर, मोहिते कॉलनी, राजलक्ष्मी नगर, देवकर पाणंद, एन टी सरनाईक नगर, योगेश्वरी कॉलनी, रायगड कॉलनी, चव्हाण कॉलनी, मोहिते कॉलनी, गणपती नगर, पार्वती पार्क, भोसले कॉम्प्लेक्स, मल्हार रेसिडेन्सी, शिवप्रभूनगर, मोरेमाने नगर, राणे कॉलनी, राजु गांधीनगर, आक्काताई माने नगर, महादेव नगरी, जनाईदत्त नगर, विद्या विहार कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, संभाजीनगर स्टॅड परिसर, नविन मोरे कॉलनी, जोशी नगर, विजयनगर, शहाजी वसाहत, संभाजीनगर, कोल्हापूर सॉ मिल, गंजीमाळ, रामानंदनगर, जरगनगर, रेणुका नगर, आर.के.नगर, गणेश कॉलनी, हनुमान नगर, जोतिर्लिंग कॉलनी, रायगड कॉलनी, हॉकी स्टेडीयम, संदिप बेकरी, बालाजी पार्क, यशवंत कमल पार्क, जाधवनगर, खंडोबा मंदिर, भारत नगर, सौदानगर, सुभाषनगर, वाय.पी.पोवारनगर, मंगळवार पेठ, वारे वसाहत, शाहु बँक परिसर, राम गल्ली, भारत डेअरी परिसर, मंगेशकर नगर, बेलबाग, मंडलिक वसाहत, पाटाकडील तालीम, बजापराव तालीम, जासुद गल्ली, कोळेकर तिकटी, पोवार गल्ली, शिवाजी पेठ, वेताळ माळ तालीम, 8 नंबर शाळा, फिरंगाई गल्ली, टिंबर मार्केट, कोंडेकर गल्ली, सरदार तालीम परिसर, शहाजी वसाहत, साळोखेनगर टाकीअंतर्गत कणेरकर नगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, बीडी कॉलनी बोंद्रेनगर, राजोपाध्येनगर, बाबा ग्रुप, सानेगुरूजी वसाहत, राजेसंभाजी, हिंदु कॉलनी, सुलोचना पार्क, राधानगरी रोड, क्रशर चौक, मोहिते पार्क, केदार पार्क, देशमुख शाळा, शिवाली पार्क इत्यादी भागातील नागीकांना दैनंदिन होणारा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तरी या भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…