no images were found
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची दिलखुलास मुलाखत
मुंबई, ;लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी लागू असलेली आदर्श आचारसंहिता याविषयी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ वृत्त निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. आदर्श आचारसंहिता म्हणजे काय ? या कालावधीत काय करावे आणि काय करू नये, समाज माध्यमांसाठीनियम, पेड न्यूज कोणती असते, आचारसंहिता भंग केल्यानंतर होणारी कारवाई यासह आचारसंहितेबद्दल सविस्तरमाहिती डॉ. किरण कुलकर्णी यांनी दिलखुलासआणि जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मितदिलखुलास कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची मुलाखत सोमवार दि. २२, मंगळवार दि.२३ आणि बुधवार दि. २४ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत
प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. २३ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक