
no images were found
रामनवमीला प्रभू श्रीरामांच्या जन्मदिनाचे साजरीकरण!
प्रभू श्रीरामांच्या जन्मानिमित्त साजरा केला जाणाऱ्या रामनवमी सणाचे हिंदू सणांमध्ये मोठे महत्त्व आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षामधील नवमी तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला. रामनवमीच्या आधी भक्त नऊ दिवस चैत्र नवरात्रीदरम्यान दुर्गादेवीच्या नऊ रूपांची आराधना करतात आणि नवव्या दिवशी रामनवमी सण साजरा करतात. रामनवमी सण जवळ आला असताना एण्ड टीव्हीवरील कलाकार नेहा जोशी (मालिका ‘अटल’मधील कृष्णा देवी वाजपेयी), गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश सिंग) आणि विदिशा श्रीवास्तव (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अनिता भाबी) प्रभू श्रीरामांचा दिव्य वारसा व साजरीकरणाबाबत सांगत आहेत, जेथे ते या साजरीकरणामधील आध्यात्मिक वातावरणामध्ये सामावून जातात. मालिका ‘अटल’मधील नेहा जोशी ऊर्फ कृष्णा देवी वाजपेयी म्हणाल्या, ”देशभरात रामनवमी सण जल्लोषात साजरा केला जातो, ज्यामधून प्रभू श्रीरामांप्रती दृढ श्रद्धा दिसून येते. माझ्या बालपणी मी जवळच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी रात्रभर रांगेत उभी राहायची, जेथे साजरीकरण जल्लोषात असायचे. नवरात्रीच्या नऊ दिवसांदरम्यान मी मंदिरामध्ये जाऊन दुर्गामातेचा आशीर्वाद घेते. माझ्या आजीने प्रभू श्रीरामांचे जीवन व साहसावर आधारित महाकाव्य रामायण सांगितले. या परंपरेमुळे रामनवमी सणाचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व तरूण पिढ्यांकडे हस्तांतरित करण्यास मदत होते. यंदा रामनवमी सण माझ्यासाठी अत्यंत संस्मरणीय ठरला. मला रामनवमी सण साजरीकरणापूर्वी अयोध्यामधील राम मंदिरामध्ये जाण्याची संधी मिळाली, तेथील भव्यता पाहून मी भारावून गेले आणि माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. रामलल्लाच्या दिव्य मूर्तीसमोर उभे राहत आशीर्वाद घेण्याचा क्षण संस्मरणीय होता. या आध्यात्मिक तीर्थयात्रेने माझ्या हृदयावर व मनावर अमिट छाप निर्माण केली आणि मला आध्यात्मिकतेचा अनुभव दिला. रामनवमी हा उत्साहपूर्ण सण आहे, जो समुदायांना एकत्र आणत प्रभू श्रीरामांच्या मूल्यांना जपतो. हा सण प्रभू श्रीरामांची अंतर्गत मूल्ये धार्मिकता, दयाळूपणा व भक्ती यांची आठवण करून देतो, तसेच भक्तांना जीवनधर्माचे पालन करण्यासह इतरांची सेवा करण्यास प्रेरित करतो. ‘जय श्रीराम!”
मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”दुर्गामाता व प्रभू श्रीरामाची निस्सीम भक्त असल्यामुळे मी प्रत्येक दिवस देवासमोर हात जोडत, कृतज्ञता व्यक्त करत आणि माझ्या प्रियजनांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत सुरूवात करते. चैत्र नवरात्री व रामनवमीदरम्यान मी आध्यात्मिकता म्हणून उपवास करते, ही परंपरा मला माझ्या आईकडून मिळाली आहे, जी मी आजही कायम राखली आहे. माझ्यासाठी या उपवास कालावधीचे खूप महत्त्व आहे, माझ्यामध्ये दैवी नाते व शुद्धतेची भावना जागृत होते. वर्षानुवर्षे मला उपवासाचे लाभदायी महत्त्व समजले आहे, ज्यामुळे तन-मन निर्मळ होऊन जाते. संपूर्ण सणादरम्यान मी सात्विक आहाराचे सेवन करते, ज्यामध्ये कुट्टू आटा, सिंघाडा आटा आणि ताजी फळे व ड्रायफ्रूट्सचा समावेश असतो. चैत्र नवरात्री व रामनवमी सण जवळ आला असताना मी सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांचे जीवन आनंद, समृद्ध व आध्यात्मिकतेने भरलेले असो ही प्रार्थना. हा शुभ सण प्रत्येक मनावर व कुटुंबावर आशीर्वाद व दैवी कृपा राखो. जय माता दी! सर्वांना नवरात्री व रामनवमीच्या आनंदमय शुभेच्छा!” मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील विदिशा श्रीवास्तव ऊर्फ अनिता भाबी म्हणाल्या, ”वाराणसीमध्ये रामनवमी खास सण आहे, जेथे रस्ते व पवित्र घाटांवर आध्यात्मिक उत्साह दिसून येतो. लोक दूरवरून संकट मोचन मंदिर व दुर्गा कुंड मंदिर अशा प्रभू श्रीरामांच्या मंदिरांना भेट देण्यासाठी येतात. बालपणी माझे रामलीलाने लक्ष वेधून घेतले, ज्यामधून प्रभू श्रीरामाचे जीवन व ध्येयाची कथा सांगितली जाते. सायंकाळी माझी आई मला गंगा नदी घाटवर घेऊन जायची, जेथे आम्ही गंगा आरतीचा आनंद घ्यायचो. तेथील नयनरम्य दृश्य यात्रेकरू व भक्तांचे लक्ष वेधून घ्यायचे. यंदा आम्ही रामनवमीला आमच्या घरामध्ये पूजा करणार आहोत, प्रभू श्रीरामाची लहान मूर्ती किंवा फोटोची आराधना करणार आहोत. पाणी, दूध, मध, दही, तूप व फळांचा रस अर्पण करत अभिषेक करणार आहोत आणि प्रभू श्रीरामांच्या मूल्यांची स्तुती करणारे मंत्र जप करणार आहोत. रामनवमी साजरीकरण भगवान विष्णूच्या दैवी अवतारांप्रती भक्ती व आदराचा वारसा आहे, जेथे प्रेम, धार्मिकता व आध्यात्मिकतेमधून सर्वांना प्रेरणा मिळते.”