Home राजकीय कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने; खास. प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित : राजेश क्षीरसागर

कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने; खास. प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित : राजेश क्षीरसागर

0 second read
0
0
36

no images were found

कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने; खास. प्रा. संजय मंडलिक यांचा विजय निश्चित : राजेश क्षीरसागर

 

कोल्हापूर (प्रतिनिधी): लोकसभा निवडणुकीसाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने “अब की बार ४०० पार” चा नारा दिला आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करून राज्यात महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्यासाठी मतदार सज्ज झाले आहेत. देशात गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकासाचे काम, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील विकास काम आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्यात झालेले विकासाचे, जनहिताचे काम पाहता जनता महायुतीच्या पाठीशी ठाम उभी आहे. नियोजनात्मक प्रचारातून विकास कामाची शिदोरी घेवून मतदारांपर्यंत पोहचणार असून, कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने असल्याने खास.प्रा.संजय मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले.
महायुतीचे शिवसेना उमेदवार खास.प्रा.संजय मंडलिक यांच्या प्रचार शुभारंभाच्या अनुषंगाने आज शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे “मिसळ पे चर्चा” पार पडली. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी आगामी काळात प्रचार फेरी, कॉर्नर सभा, प्रभागवार बैठका, अंगीकृत संघटनाचे मेळावे, पोलिंग बूथप्रमुख आदी बाबींची माहिती व सूचना उपस्थित महायुती पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. अपवाद वगळता कोल्हापूर शहरानेही कायमच शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार शिवसेनेच्या भगव्याला साथ दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील विकासाचे काम, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील जनहिताचे काम हेच आमच्या प्रचाराचे मुख्य अस्त्र असणार आहे. या कामाची शिदोरी घेवून महायुतीचे शिलेदार मतदारांपर्यंत जात आहेत. विरोधकांकडे टिकेशिवाय इतर कोणताही मार्ग नाही पण कोणत्याही विवादात न पडता या टीकेला आम्ही कामाने उत्तर देवू. आमच्या कामाच्या बळावर आम्ही निवडणूक लढविण्यास सज्ज असून, खास.प्रा.संजय मंडलिक यांचा नियोजनबद्ध प्रचार करू. जिल्ह्यात महायुतीस पाठबळ मिळत असून, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना खासदार प्रा.संजय मंडलिक यांनी, वडिलांच्या उत्तर कार्यानंतर तातडीने राजेश क्षीरसागर यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यांच्या माध्यमातून शहरातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. नियोजनात्मक प्रचाराची आजपासून सुरवात झाली आहे. शहराने कायमच शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला साथ दिली आहे. त्यामुळे याहीवेळी शहरवासीय शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभे राहतील, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष आदिल फरास यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे, आर.पी.आय जिल्हाध्यक्ष सोमनाथ घोडेराव, युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, सत्यजित उर्फ नाना कदम, अशोक देसाई, प्रकाश गवंडी, राहुल चव्हाण, उत्तम कोराणे, नंदकुमार मोरे, किशोर घाटगे, रमेश खाडे, उदय भोसले, तुकाराम साळोखे, महेंद्र घाटगे, सुनील जाधव, शिवसेना महिला आघाडीच्या मंगल साळोखे, अमरजा पाटील, पवित्रा रांगणेकर, भाजपच्या रूपराणी निकम, गायत्री राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या रेखा आवळे आदी महायुती पदाधिकारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प

  ‘आय.आय.एस.सी.’सोबत शिवाजी विद्यापीठ राबविणार संयुक्त संशोधन प्रकल्प   कोल्हापू…