
no images were found
न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये निर्भ यापथकाचे महिला सक्षमीकरण जनजागृती शिबिर संपन्न
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :येथील प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित, न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर यांच्या विद्यमाने निर्भया पथकाचे “ महिला सक्षमीकरण जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. छत्रपती शाहू महाराजांच्या पूजनाने झाली. सुरुवातीला कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांनी निर्भया पथक, त्यांचे चालविणारे कार्य यांविषयी विद्यार्थिनींना माहिती दिली व पाहुण्यांचे स्वागत केले.
प्रमुख पाहुण्या निर्भया पथकाच्या पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी निर्भया पथक कशा प्रकारे काम करते हे सांगितले. तसेच लैंगिक छळ प्रतिबंध कायदा, पोक्सो कायदा व रॅगिंग कायदा याबद्द्ल माहिती दिली. मुली आणि महिलांसाठी भीती घालवण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना झाल्याचे त्यांनी सांगितले. अन्याय सहन न करता निर्भय बनत तक्रार करा असे आवाहन केले. पोक्सो अंतर्गत 18 वर्षाखालील मुलगा असो की मुलगी त्यांच्यावर अत्याचार करणारा कधीच सुटत नाही.इतका हा कायदा कडक आहे असे स्पष्ट केले.
कार्यक्रमास रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरचे प्रेसिडेंट श्रेयस पाटील, रो. सनम पटेल, रो. प्रनोती जोशी, तसेच शाहूपुरी पोलिस स्टेशनच्या निर्भया पथकातील सर्व सहकारी व पोलीस मित्र उपस्थित होते.कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रा. वैष्णवी निवेकर व आभार प्रदर्शन प्रा.दिव्या शिर्के यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियूषा नेजदार यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी कॉलेजच्या विद्यार्थिनी शिक्षक शिक्षेक्तर कर्मचारी उपस्थित होते.