
no images were found
डीकेटीई मध्ये ‘टेक्स्टव्हिजन फॅशनोव्हा २०२४‘ स्पर्धा उत्साहात संपन्न
इचलकरंजी : डीकेटीई, टेक्स्टाईल असोसिएशन इंडिया मिरज युनिट (टायमु) आणि स्टुडट चाप्टर ऑफ टायमु यांच्या संयुक्त विद्यमाने टेक्स्टव्हीजन आणि फॅशनोव्हा २०२४ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डिझाईन कलेक्शन व प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, आय ऑन पिक ग्लास व स्टार्टेक्स ५.० अशा विविध स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. डीकेटीईच्या वतीने गेली २६ हून अधिक वर्षे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ‘ट्रान्सफॉर्मींग लाईफस्टाईल व्हीथ : वर्क फिट अटायर ऍण्ड निओ स्ट्रेच: फ्रिडम टू मूव्ह‘ या थीमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण राजवाडा परिसर विद्यार्थ्यांनी आधुनिक कल्पकतेने सजविला होता.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉनिएर इंडस्ट्रीचे प्रेसिंडट, आनंद पाटील होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. संस्थेच्या प्र. संचालिका, डॉ एल.एस.अडमुठे यांनी स्वागतपर भाषणामध्ये डीकेटीईच्या प्रगतीचा आलेख मांडला. आर संपत, प्रेसिडंट टायमु यांनी टेक्स्टाईल असोसिएशनच्या उपक्रमाचा आढावा घेतला. मानद सचिव, डॉ सपना आवाडे यांनी दर्जेदार शिक्षण देणे हा नेहमीच डीकेटीईचा ध्यास आहे. डीकेटीईचे माजी विद्यार्थी जगभरात विविध इंडस्ट्रीजमध्ये मोठमोठया पदावर कार्य करीत आहेत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व डॉनिएर इंडस्ट्रीजचे प्रेसिडंट हे दखील डीकेटीईचेच माजी विद्यार्थी आहेत असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आनंद पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात डीकेटीईतील विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत डीकेटीईमध्ये जडणघडण होत असताना आम्हाला देखील आमच्या कलागुणांना वाव देणा-या विविध संधी प्राप्त झाल्या त्यामुळे आम्ही यशस्वी झालो असे नमूद केले. देशाचा भावी अभियंता हा इंडस्ट्रीजमध्ये होणा-या बदलांचे आव्हान पेलणारा असावा त्यासाठी विद्यार्थ्यांनी उत्कटता, अभिमान, वचनबध्दता, आव्हान, टीमवर्क, पारदर्शकता, निर्भयता यासारखी नैतिक मूल्ये आत्मसात करावीत व सातत्यपूर्ण परिश्रम करावे असे अवाहन केले. टायमु प्रेसिडंट, दर्शन खटोड यांनी टेक्टव्हिजन फॅशनोव्हा स्पर्धेची पार्श्वभुमी सांगितली. इन्स्टिटयूटचे उपसंचालक व टेक्स्टाईल विभागप्रमुख प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी आभार व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी रोहीणी त्रिपुदे, संदीप पाटणी, श्वेता ठाकून, ज्योती हिरेमठ, चैतन्य चंगिया, प्रा. डॉ. एम.वाय. गुडियावर, प्रा. डॉ. वाय.एम.इंडी, प्रा. आर.एल.गोटीपामुल यांनी परिक्षणाचे काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. आर.एच. देशपांडे व डॉ. व्ही.के.ढंगे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सी.आर.जामदार, व्ही.ए.सातपुते, डॉ एस.एस. लवटे यांच्यासह सर्व कोर्स कोर्डिनेटर, प्राध्यापक यांची प्रमुख उपस्थिती होती.