
no images were found
रिजर्व बँक ऑफ इंडियातर्फे उद्योजकांसाठी चर्चासत्राचे आयोजन
कोल्हापूर : जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योजकांसाठी भारतीय रिज़र्व बँक (मुंबई), वित्तीय समावेश आणि विकास विभागातर्फे दि. 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता दरबार बँक्वेट हॉल, फॉरच्युन प्लाझा, इचलकरंजी येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमास भारतीय रिज़र्व बँक, वित्तीय समावेश आणि विकास विभाग, मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्र (DIC) चे अधिकारी तसेच SIDBI चे वरिष्ठ अधिकारी उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत. चर्चासत्रात उद्योजकांना आपल्या व्यवसायाशी निगडीत धोरणात्मक सूचना, बँकिंग समस्यांबाबत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करता येणार आहे.
ही बैठक जिल्ह्यात इचलकरंजी येथे प्रथमच होत असल्याने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी या चर्चासत्रास उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय रिज़र्व बँकेच्या जनरल मॅनेजर कल्पना मोरे यांनी केले आहे.